Cotton from Parbhani, Pathri, Gangakhed will be procured by hamidar 
मुख्य बातम्या

परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची हमीदराने खरेदी होणार

परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे परभणी, पाथरी, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कापूस खरेदी केली जाणार आहे.

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे परभणी, पाथरी, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कापूस खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी परभणी जिल्हा संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. लवकरच प्रत्यक्ष कापूस खरेदीस सुरवात केली जाईल’’, अशी माहिती पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक ए. डी. रेणके यांनी दिली.

पणन महासंघातर्फे यंदाच्या हंगामात कापूस खरेदीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी (ता.३०) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, रेणके, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर, सहकार, पणन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर प्राप्त क्रमांकानुसार एसएमएस पाठविण्यात येईल. नोंदणीधारकास टोकन दिल्यानंतर पणन महासंघातर्फे कापूस खरेदी केली जाईल.

शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणताना सोबत २०२०-२१ च्या हंगामातील कापूस पेऱ्याची नोंद असलेला सातबारा, तसेच होर्डिंग प्रमाणपत्राची अद्ययावत प्रत, जनधन खात्यांव्यतिरिक्त अन्य आधार सलंग्न राष्ट्रीयकृत बॅंकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची सुस्पष्ट छायांकित प्रत, आधारकार्डच्या प्रत्येकी दोन प्रती आणाव्यात. कागदपत्रसोबत कार्यरत मोबाईल क्रमांक नमुद करावा.पीकपेऱ्यानुसार कापूस खरेदी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Surveyor: जमीन मोजणीसाठी ५ हजार खासगी सर्वेअर घेणार, ३५ हजार पगार, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Fodder Shortage : शेतकऱ्यांची चिंता वाढली! चारा फक्त जानेवारीपर्यंतच पुरणार

Mahendri Agro Tourism : कृषी पर्यटनात मानाचा तुरा! सीमेवरील 'महेंद्री ॲग्रो टुरिझम'ला जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

ZP Administrative Expenses: दुष्काळातही उधळपट्टी! जिल्हा परिषदेत तात्पुरत्या केबिनवर साडेचार कोटींचा खर्च

Agrowon Podcast: हरभरा दरात बदल, गहू दरात चढ-उतार, कांदा दरात टिकून, कोथिंबीर आवकेत चढ-उतार तर पेरू दरात चढ-उतार

SCROLL FOR NEXT