Cotton cultivation in Jalgaon district increased by 14,000 hectares
Cotton cultivation in Jalgaon district increased by 14,000 hectares 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात कापूस लागवडीत १४ हजार हेक्टरने वाढ

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात पीक पेरणीसंबंधीची माहिती अंतिम झाली आहे. यात पेरणी ९६ टक्क्यांवर झाली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात सुमारे सात लाख ६८ हजार हेक्टरपैकी तब्बल पाच लाख २५ हजार हेक्टरवर कापूस आहे. ही लागवड या हंगामात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १४ हजार हेक्टरने वाढली आहे.

खानदेशात यंदा मका पिकाचे क्षेत्रही वाढले आहे. तृणधान्यात मक्याची लागवड अधिक झाली आहे. खानदेशात मिळून सुमारे सव्वालाख हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. एकूण सुमारे नऊ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाल्याची माहिती मिळाली. कापूस उत्पादनात जळगाव जिल्हा राज्यात अग्रेसर आहे.

राज्यात कापूस लागवडही जळगाव जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रात होत असते. कापूस लागवडीत पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्रही बऱ्यापैकी आहे. हे क्षेत्र जळगाव जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्टर आहे. तर, धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे ६० हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे. 

कोरडवाहू कापूस पीक अधिक आहे. यंदा पाऊस बरा असल्याने जूनच्या मध्यात लागवड झालेल्या कापसाची स्थिती बरी आहे. पूर्वहंगामी कापसाचे अतिपावसात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, पाचोरा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार भागात नुकसान झाले आहे. सध्या कापूस पिकात किडनाशकांची फवारणी सुरू आहे. पावसाने मागील दोन दिवसांपासून काही भागात उघडीप दिली आहे. यामुळे किडनाशके, अळी प्रतिबंधकांचा उपयोग करून फवारणीचे काम सुरू आहे.

पूर्वहंगामी कापूस पिकाचे अतिपावसात नुकसान झाले आहे. कोरडवाहू कापूस पिकाची स्थिती बरी आहे. पिकाची चांगली वाढ होण्यासाठी शेतकरी किडनाशकांचा उपयोग करीत आहेत. - दीपक पाटील, शेतकरी, माचला (जि.जळगाव)

वर्ष  कापूस पेरा (हेक्टरमध्ये)
२०१८-१९ ४ लाख ९१ हजार ६०९
२०१९-२० ५ लाख १० हजार ९११
२०२०-२१ ५ लाख २५ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT