Corona Correspondent closed weekly market in Sindhudurg district
Corona Correspondent closed weekly market in Sindhudurg district  
मुख्य बातम्या

कोरोनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवडे बाजार राहणार बंद

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत भरविण्यात येणारे आठवडा बाजार बंद केले आहेत. बाजार बंदची माहिती व्यापाऱ्यांना वेळेत न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ झाला. 

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकांवर बारीक लक्ष ठेवले आहे. संशयास्पद लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडला, अशी अफवा पसरविणाऱ्या तीन स्थानिक वृत्तवाहिन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पोलिसांना दिले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आणखीनच सतर्क झाला आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकांची जिल्हा सीमेवरच तपासणी केली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

तालुका किंवा इतर प्रमुख ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजारांमध्ये इतर जिल्ह्यातील शेकडो व्यापारी येतात. याशिवाय आठवडा बाजारांमध्ये मोठी गर्दी होते. ती टाळण्यासाठी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वैभववाडी येथे बुधवारी भरविण्यात येणारा बाजार अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आलेल्या शेकडो व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली.

दरम्यान, आरोग्य यंत्रणेकडून संशयास्पद लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. आरोग्य विभाग कोणतीही जोखीम उचलण्यास तयार नाही, तर दुसरीकडे जिल्हाधिकारी अतिशय सर्व स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला, अशी बातमी जिल्ह्यातील तीन स्थानिक वेब पोर्टल वृत्तवाहिन्यांनी दिली होती. प्रत्यक्षात जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. त्या तीनही वृत्तवाहिन्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT