The conundrum of sweet potato growers 
मुख्य बातम्या

रताळे उत्पादकांची कोंडी

अवेळी पावसामुळे फळ मरीचे वाढलेले प्रमाण व त्यामध्येच दराची घसरण झाल्याने रताळे उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा : अवेळी पावसामुळे फळ मरीचे वाढलेले प्रमाण व त्यामध्येच दराची घसरण झाल्याने रताळे उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्याच्या कार्वे भागात मोठ्या प्रमाणात रताळे पिकवली जातात. त्या परिसरातील शिवारात शेतकऱ्यांची सुगी उरकण्याची हातघाई सुरू आहे. गेल्या महिन्यापूर्वीच्या अवेळी पावसामुळे रताळ्यातील फळांचे मर होण्याचे प्रमाण वाढल्याने अपेक्षित उत्पादनात घट झाली आहे. तोच बाजारपेठेत दराची घसरण झाल्याने या पिकातील आर्थिक गणित बिघडणार आहे. 

दैनंदिन आहारामध्ये फळांचे महत्त्व असल्याने महाग असली, तरी खाणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. रताळे विक्रीचा दर प्रतिकिलो ५० रुपयांचा टप्पा ओलांडू शकलेले नाही. केवळ हॉटेलमध्ये याचा वापर होत असल्याने पिकलेला माल खपला जातो. अशा परिस्थितीत या पिकाचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांना फायदा देणारे आहे. 

पिकासाठी उपयुक्त जमीन व कमी खर्चात या पिकाचे उत्पन्न मिळत असल्याने कार्वे येथे या पिकाचे मोठे क्षेत्र आहे. जवळपास पन्नास वर्षांपासून या गावात शेतकरी रताळे पीक घेत आहेत. दरवर्षी शंभर एकर शेतीत रताळे पिकतात. खरिपात बदलामपूरी जातीची सर्रास लागवड होते. शेतात लावलेले पीक साधारण डिसेंबरमध्ये काढणीस येते. यंदा अवेळी पडलेल्या पावसामुळे हंगाम लांबला आहे. जमिनीत अधिक काळ पाणी राहिल्याने फळांच्या मरीचे प्रमाण जास्त वाढले आहे. एकरी आठ टन उत्पादन मिळण्याऐवजी काही क्षेत्रात ते पाच ते सहा टन इतके मिळाले आहे. काही क्षेत्रात निम्म्यापेक्षा जादा उत्पादन घटले आहे. तोच दुसऱ्या बाजूला मार्केटमध्ये विक्रीचा दरही घसरला आहे. प्रति किलो अठरा ते २२ रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT