कर्जमाफीच्या प्रलंबित प्रकरणांबाबत बँकेशी संपर्क साधावा : सहकारमंत्री 
मुख्य बातम्या

कर्जमाफीच्या प्रलंबित प्रकरणांबाबत बँकेशी संपर्क साधा : सहकारमंत्री

टीम अॅग्रोवन

मुंबई : कर्जमाफीच्या प्रलंबित प्रकरणांबाबत पात्र शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता. ३०) केले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती नियुक्त केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत व शाखांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत तातडीने सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करून त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणीनंतर ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन योजनेेअंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले         आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mangrove Conservation : कांदळवन संवर्धनातून साकारतेय हरित अर्थव्यवस्था

Improved Crop Variety : महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित पिकांचे सुधारित वाण

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ महामार्ग : राजू शेट्टी

Dairy Farming Success : दुग्ध व्यवसायात अंमळनेरची प्रगती

Maharashtra Assembly Fight: महाराष्ट्र विधानसभा लॉबीमध्ये हाणामारी; आमदारांचे कार्यकर्ते भिडले, अटक आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप

SCROLL FOR NEXT