Google AI In Agri : गुगलकडून भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, आरोग्य आणि शिक्षणासाठी ८ दशलक्ष डॉलर्सची घोषणा
AI In Agriculture : शेतीसाठी हवामान माहिती, पिकांचे रोग ओळखणे, उत्पादन वाढवणे आणि योग्य सल्ला देणारे एआय-आधारित अॅप्लिकेशन्स विकसित करण्यात येणार आहेत. ही प्रणाली शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत मार्गदर्शन करेल, असा दावा गुगलने केला आहे.