Buldana News: समृद्धी कृषी नवनगर उपसमितीची तात्काळ बैठक घेऊन कृषी नवनगर प्रकल्पाला गती देण्याची मागणी आमदार मनोज कायंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपसमितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी बैठक घेतली, तर समृद्धी नवनगर प्रकल्पाला गती मिळून कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी विधानमंडळात बोलताना सांगितले. .सिंदखेडराजा तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गालगत असलेल्या माळसावरगांव, नशिराबाद गांवाजवळ कृषी समृद्धी नवनगर प्रस्तावित असल्यामुळे स्मार्ट सीटीच्या माध्यमातून विकासाला चालना देण्यासाठी नशिराबाद गावातील ३७२.२५ हेक्टर अतिरिक्त जमीन कृषी समृद्धी नवनगरमध्ये समावेश करण्याचा निर्णय शासनाने निर्गमित केला आहे. .Krishi Samruddhi: ‘कृषी समृद्धी’तील नावीन्यपूर्ण बाबीला तात्पुरती स्थगिती.या प्रकल्पात सुमारे दोन हजार ५०० शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. समृद्धी कृषी नवनगराचे काम अद्यापही प्रत्यक्षामध्ये सुरू झाले नाही. सिंदखेडराजा व देऊळगांवराजा तालुक्यातील माळ सावरगाव, निमखेड व गोळेगाव या गावातील १९४५ हेक्टर जमीन या समृद्धी कृषी नवनगरसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. नशिराबाद गांवातील ३७२.२५ हेक्टर अतिरिक्त जमीन कृषीसमृद्धी नवनगरात समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेचनवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे..Krishi Samruddhi Yojana: ‘कृषी समृद्धी’त नावीन्यपूर्ण योजनांना ‘रेड सिग्नल’!.प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासोबतच परिसरातील भागाचा आर्थिक व सामाजिक विकास साधला जाणार आहे. कृषी समृद्धी नवनगरमुळे परिसरातील हजारो युवकांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे उपसमितीची बैठक तात्काळ घेण्याची मागणी आ. कायंदे यांनी केली..प्रकल्पामुळे परिसराचा कायापालटकृषी समृद्धी नवनगरच्या माध्यमातून कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे, स्थानिक शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि या भागाचा आर्थिक विकास साधणे आहे. या प्रकल्पात सुमारे दोन हजार ५०० शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे. प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासोबतच परिसरातील भागाचा आर्थिक व सामाजिक विकास साधला जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.