फसव्या कर्जमाफीवरून कॉँग्रेसचे राज्यभर जनआक्रोश आंदोलन
फसव्या कर्जमाफीवरून कॉँग्रेसचे राज्यभर जनआक्रोश आंदोलन 
मुख्य बातम्या

सरकारची तीन वर्षांतील कामगिरी निराशाजनक

टीम अॅग्रोवन

मुंबई : गेल्या तीन वर्षांत सरकारची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. फसवी शेतकरी कर्जमाफी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, यवतमाळ शेतकरी दुर्घटनेप्रकरणी सरकारची असंवेदनशीलता वाढल्याचे उघड झाले आहे. या सर्वांविरोधात ३१ अॉक्टोबरपासून जनआक्रोश आंदोलन उभारण्यात येईल. नगर जिल्ह्यातून आंदोलनाची सुरवात होऊन समारोप नागपूर आधिवेशनात करण्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत केली. जनआक्रोश आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कॉँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते सचिन सावंत या वेळी उपस्थित होते.   चव्हाण म्हणाले, ‘‘नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला, देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या निर्णयाला ८ नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे, त्या दिवशी काळा दिवस पाळून सांगलीत विराट जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलन पार पडेल. आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.’’ ‘‘कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ होता. शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. सरकारने अटी शर्ती घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळले. राज्याभर कर्जमाफीचा सावळा गोंधळ सुरू आहे.’’ कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीच्या सक्तीची अट तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना इतिहासात कधी नव्हे एवढी अपमानास्पद वागणूक या सरकारने दिली, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. रोज नवे जीआर काढून नियम बदलले, तारीख पे तारीख असे सरकारचे काम चालले आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांना सरकार कसे चालवायचे ते माहीत नाही. यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT