The concept of 'Madhache Gaav' originated from Manghar village
The concept of 'Madhache Gaav' originated from Manghar village 
मुख्य बातम्या

मांघर गावातून ‘मधाचे गाव’ संकल्पनेची सुरुवात

टीम अॅग्रोवन

सातारा : मधमाशांची घटती संख्या शेती व पर्यावरणासाठी हानिकारक आहे. तसेच निसर्गाचा समतोल कायम ठेवण्यासाठी मधमाशांचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी ‘मधाचे गाव’ ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात खादी व ग्रामोद्योग विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा यांनी दिली.

मांघर (ता. महाबळेश्वर) येथे अंशु सिन्हा यांच्या हस्ते मधपाळांना मधपेट्या वाटप करण्यात आल्या. यावेळी सिन्हा बोलत होत्या.या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, मध संचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, सहायक वन संरक्षक सोनवणे, मांघर गावच्या सरपंच, ग्रामसेवक व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

सिन्हा म्हणाल्या की, मांघर हे गाव संपूर्ण राज्याला मधमाशापालनासाठी दिशादर्शक ठरणार आहे. राज्यभर राबविण्यात येणारी योजना मांघर या गावापासून सुरू होत आहे. गावातील लोकांना शासनाच्या विविध योजनात सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच निसर्गपर्यटन आणि मधमाशा संगोपनातून स्वयंपूर्ण गाव ही मधाच्या गावाची संकल्पना आहे. या गावाचे सुशोभीकरण आणि मधाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या गावातील लोकांचा उत्साह मांघर गाव मधाचे गाव करण्यासाठी लोकचळवळ तयार होईल, असा विश्वास आहे.

बिपीन जगताप यांनी ही मार्गदर्शन करताना सांगितले की, मधाचे गाव ही संकल्पना अंशु सिन्हा यांची असून राज्यातील मधमाशापालनाला उपयुक्त भागात राबविण्यात येणार आहे. मधाचे गाव ही संकल्पना गावांना स्वयंपूर्ण करण्याबरोबरच निसर्ग संवर्धन करणारी आहे. कार्यक्रमात स्थानिक मधपाळांना मधपेट्या वाटप करण्यात आले. गावाची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव जाधव यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT