चारा छावणी
चारा छावणी  
मुख्य बातम्या

चारा छावणीत संगणकीय प्रणालीचा वापर करावाच लागेल

टीम अॅग्रोवन

नगर: जनावरांच्या छावणीत जनावरांची जास्तीची संख्या दाखवून अनुदान लाटण्याचा प्रकार थांबवण्यासाठी जनावरांची नोंद संगणकीय प्रणालीत करावी, त्यासाठी जनावरांना बारकोड टॅगिंग, मोबाईल वापरातून स्कॅनिंग आदी बाबी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र छावणी चालकांनी त्याला विरोध केला आहे. ‘‘शासनाने हा नियम घालून दिला आहे. कोणत्याही परिस्थिती संगणकीय प्रणालीचा वापर करावाच लागेल,’’ असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले. जर संगणकीय प्रणालीचा वापर केला नाही, तर छावणीचालकांना अनुदानापासून मुकावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.   जनावरांच्या छावणीतील दाखल जनावरांची नोंद संगणकीय प्रणालीद्वारे करायची आहे. त्यासाठी प्रत्यक जनावराला बारकोड टॅगिंग करून ते मोबाईलमध्ये स्कॅनिंग करायचे आहे. त्यामुळे छावणीत असलेल्या जनावरांचा अचूक आकडा प्रशासनाला कळणार आहे. छावणीतील गैरव्यवहार, जास्तीची जनावरांची संख्या दाखवून अनुदान लाटण्याचा मात्र नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच छावणीचालकांनी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याला विरोध केला आहे. राजकीय नेत्यांना सोबत काही छावणीचालकांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र ‘‘शासनाने हा नियम काढला आहे. त्यात काहीही बदल करता येणार नाही. संगणक प्रणालीचा वापर करावाच लागेल.’’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्प्ष्ट केलेय. शनिवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी या वेळी उपस्थित होते.  चारा छावणी, रोजगार हमीची कामे आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आदी उपाययोजनांचा आढावा घेतला. पशुधनाची नोंद घेण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करावा, असे छावणीचालक संस्थांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्राद्वारे कळविले आहे. संगणक प्रणालीचा वापर केला नाही तर अनुदान मिळणार नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे छावणीचालक व त्यांची बाजू घेणारे नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. बुधवार (ता. १५) पासून संगणकीय प्रणालीचा वापर करायचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT