संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

थंडीचे आगमन लांबणार

टीम अॅग्रोवन

पुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत असल्याने थंडीचे आगमन काहीसे लांबण्याची शक्यता आहे. यंदा साधारणत: नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात थंडीचा कडका वाढण्यास सुरवात होईल, अशी माहिती हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी दिली. राज्यात आणखी काही दिवस पावसाची शक्यता असल्याचेही डॉ. कश्‍यपी यांनी सांगितले. 

डॉ. कश्‍यपी म्हणाले, की आतापर्यंत किमान तापमानात घट होण्यास सुरवात होणे अपेक्षित होते. मात्र, मॉन्सून परतल्यानंतर पडत असलेल्या पावसाने किमान तापमानात घट झालेली नाही. २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान किमान तापमान काहीसे कमी होईल. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढू लागेल. मात्र राज्यात सर्वदूर थंडी वाढण्यासाठी दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे.  

महाराष्ट्रासह देशभरातून मॉन्सून नुकताच परतला आहे. काही दिवस उन्हाचा चटका वाढल्यानंतर अंशत: ढगाळ हवामान होत आहे. तसेच मॉन्सूनोत्तर पावसाला सुरवात झाली आहे. शुक्रवारी (ता. १८) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटांच्या परिसरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे दक्षिणेकडून अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. तर पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून देखील वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. हे दोन्ही वारे मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि मराठवाड्याच्या परिसरावर एकमेकांना धडकत आहेत. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT