Hawaman  
मुख्य बातम्या

ढगाळ वातावरणाचा इशारा 

राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. आज (ता. ३) राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. मंगळवारी आणि बुधवारी आकाश निरभ्र राहणार आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. आज (ता. ३) राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. मंगळवारी आणि बुधवारी आकाश निरभ्र राहणार आहे. तर गुरुवारपासून पुन्हा वादळी वारे वाहून मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रावाताची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र व परिसरात अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी होऊन उकाड्यात घट झाली आहे. त्याचा परिणाम कमाल तापमानावर झाला आहे. मात्र विदर्भात काही भागांत आकाश कोरडे असल्याने चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे पारा चांगलाच वाढला आहे. रविवारी (ता. २) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रात होत असलेल्या पावसामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला आहे. यामुळे कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे महाबळेश्‍वर येथे १८.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. 

पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कमाल तापमानात चढउतार होणार आहे. सध्या कोमोरीन परिसर व दक्षिण तमिळनाडू परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रीय आहे. तसेच मध्य प्रदेश व परिसरात व वायव्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. याशिवाय उत्तर कर्नाटक ते कोमोरिन परिसर, दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  सोमवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ.  गुरुवार ः संपूर्ण, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर.  रविवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३५.९ 
  • अलिबाग ३२.७ 
  • रत्नागिरी ३४.२ 
  • डहाणू ३२.९ 
  • पुणे ३६.८ 
  • जळगाव ३९.५ 
  • कोल्हापूर ३६.६ 
  • महाबळेश्‍वर ३०.४ 
  • मालेगाव ४० 
  • नाशिक ३६.८ 
  • सांगली ३९ 
  • सातारा ३७.१ 
  • सोलापूर ४१ 
  • औरंगाबाद ३७.८ 
  • परभणी ३९.४ 
  • नांदेड ३९ 
  • अकोला ४०.१ 
  • अमरावती ४०.२ 
  • बुलडाणा ३८.५ 
  • ब्रह्मपुरी ४२.८ 
  • चंद्रपूर ४१.८ 
  • गोंदिया ४०.६ 
  • नागपूर ४० 
  • वर्धा ४१.५ 
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    El Nino: एल निनो सक्रिय; ‘आयएमडी’चा दुजोरा

    Agriculture Loan: कृषी कर्जाची मागणी वाढणार: नाबार्ड

    Agriculture Development: शेतकरी हक्क, डिजिटल शेतीसह अन्नसुरक्षेवर भर: कृषिमंत्री चौहान

    Maharashtra Heatwave: राज्यात उष्ण लाटेचा इशारा

    India Agriculture Growth: भारतातील शेती क्षेत्राने जगात घेतली आघाडी, धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण- सीटीसीआरआय

    SCROLL FOR NEXT