शिवनेरीला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा Clear the way for Shivneri to get funding
शिवनेरीला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा Clear the way for Shivneri to get funding 
मुख्य बातम्या

शिवनेरीला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा

गणेश कोरे

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षाच्या शिवजयंतीला जाहीर केलेला २३ कोटींचा निधी अद्याप मिळाला नाही. या विकास निधी बाबत राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गुरुवारी (ता.७) आढावा बैठक घेतली. बैठकीमुळे रखडलेला निधी लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निधी रखडल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केले होते.  बैठकीला अप्पर मुख्य सचिव (नियोजन), पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाप्पा बहिर, पुरातत्त्व विभागाचे जुन्नर परिक्षेत्राचे संरक्षक सहायक बी. बी. जंगले, जुन्नर वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे आदी उपस्थित होते.    महाविकास आघाडीचे सरकार स्थापना झाल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यादांच १९ फेब्रुवारी २०२० रोजी शिवजयंतीसाठी शिवनेरीवर आले होते. त्यावेळी त्यांनी किल्ल्याच्या विकासासाठी २३ कोटींच्या निधीची घोषणा केली होती. सकाळी शिवजयंतीच्या सोहळ्यात घोषणा आणि संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठकीत निधीला मान्यता दिली होती. मात्र, यंदाची शिवजयंती जवळ आली तरी मंजूर निधी मिळाला नसल्याने विकासकामे ठप्प आहेत.    लॉन करणे वन विभागाचे काम नाही बैठकीत मुख्य सचिव संजयकुमार यांनी विविध विभागांना दर्जेदार कामे करण्याच्या सूचना केल्या. किल्ल्यावर लॉन करणे वन विभागाचे काम नाही. लॉनसाठी खूप पाणी वापरले जाते. कमीत कमी पाण्यावर जगणाऱ्या वृक्षांचे रोपण वन विभागाने करावे. विविध विभागांनी एकाच कामाची पुनर्वृत्ती टाळावी. रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी केल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT