Chemicals required for production of currant available for sale 
मुख्य बातम्या

बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने विक्रीसाठी उपलब्ध

नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनांचा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना बेदाणा निर्मिती करायची त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघ व सह्याद्री फार्म प्रयत्नशील होते. अखेर डिपिंग ऑईल व पोटॅशिअम बायकार्बोनेट उपलब्धता झाली असून द्राक्ष उत्पादकांकरिता विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या मोहाडी (ता. दिंडोरी) येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना बेदाणा निर्मितीसाठी आवश्यकता आहे, अशा शेतकऱ्यांसाठी सह्याद्री फार्म येथून मंगळवारी (ता. ७) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध राहील, असे द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे व सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी कळविले आहे.

खरेदीच्या दरम्यान ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर द्राक्ष उत्पादकांनी अनावश्यक अधिक गर्दी टाळावी. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे. संचारबंदी व जमावबंदीच्या नियमांचे पालन करून शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. बोराडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT