राज्यात सहा दिवस पावसाची शक्यता 
राज्यात सहा दिवस पावसाची शक्यता  
मुख्य बातम्या

राज्यात सहा दिवस पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका कमी झाला आहे. येत्या आठवडाभर हा चटका कमी राहणार आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

राज्यात तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा पारा खाली आला आहे. मात्र, काही भागात होत असलेल्या पावसामुळे उकाड्यात वाढ झाल्याने सकाळपासून उकाडा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला पारा आता खाली आहे. सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथे २९.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी कमाल तापमान नोंदविले गेले. रविवारी (ता. ११) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. काही भागात किमान तापमानात चढउतार झाले असून महाबळेश्वर येथे १९.४ सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. 

सध्या बिहार आणि झारखंड परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच कोमोरिन परिसर आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ या या दरम्यान चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालचा उपसागर, श्रीलंका, दक्षिण तमिळनाडूची किनारपट्टी या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. त्यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. परिणामी पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात मेघगर्जना, वादळी वारा, विजांसह पाऊस पडणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे. 

येथे होणार अवकाळी पाऊस   सोमवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ  मंगळवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ  बुधवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ  गुरूवार ः संपूर्ण विदर्भ   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : गाव-वाड्यांवरील टँकरची संख्या दीड हजार पार

Jowar Crop Policy : ज्वारीला सरकारी धोरणांचा आधार मिळेल?

Unseasonal Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळीने लाखोंचे नुकसान; कोठे छत उडाले तर कुठे वीज पडली

Interview with Dr. Nandu Lad : सहकारी आरोग्य चळवळीसाठी जनरेटा हवा

Poverty : गरिबी चोरीला जाते तेव्हा...

SCROLL FOR NEXT