Unseasonal Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळीने लाखोंचे नुकसान; कोठे छत उडाले तर कुठे वीज पडली

Unseasonal Rain in kolhapur : शनिवारी (ता.११) सायंकाळी कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे लाखोंचे नुकसान झाले.
Unseasonal Rains
Unseasonal RainsAgrowon

Pune News : राज्याच्या हवामानात बदल झाल्याने शनिवारी (ता.११) आणि रविवारी (ता.१२) पहाटे अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात दमदार बॅटींग केली. शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला. तर शनिवारी शहराला हुलकावणी देणाऱ्या पावसाने रविवारी (ता.१२) पहाटे चांगलेच धुतले. शहरात सुमारे दोन एक तास पावसाने हजेरी लावली.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी

दरम्यान, जिल्ह्यातही अनेक ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. यावेळी इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळ, चंदगड, भुदरगडसह कागलमध्ये दमदार पाऊस झाला. कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे तीन घरांचे नुकसान अवकाळीमुळे झाल्याने दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

Unseasonal Rains
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने नागपूर, भंडारा आणि चंद्रपुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

कोल्हापूर शहर

शनिवारी जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. मात्र कोल्हापूर शहराला पावसाने हूलकावनी दिली होती. दुपारी पावसाचा थोडासा शिडकावा झाल्याने तापमानाचा पारा चढला होता. मात्र रविवारी पटाहे चारनंतर विजांच्या कडकडाटात पावसाने सुरुवात केली. यावेळी महावितरणने शहराची वीज काही काळ खंडित केली होती.

इचलकरंजीकरांना दिलासा

वस्त्रनगरीत सायंकाळी साडेसातनंतर विजांच्या कडकडाटात पावसाने सुरूवात केली. येथे सुमारे दीड तास पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे व्यापाऱ्याची तारांबळ उडाली होती. तर उष्म्यामुळे हैरैण झालेल्या इचलकरंजीकरांना हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळावा. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरण कार्यालयाने शहराची वीज पुरवठा खंडित केला होता.

शिरोळमध्ये पाऊस

विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाने शिरोळला झोडपले. येथे तासभर पडलेल्या पावसाने नागरिकांची मोठी धांदल उडाली. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजार उठवला.

गडहिंग्लजला दीड तास पाऊस

गडहिंग्लज शहर आणि परिसराला गेल्या दोन दिवसापासून पाऊस हूलकावणी देत होता. परिसरात गेल्या महिनाभरात तीन-चार वेळा पाऊस झाला. मात्र तो म्हणावा तसा झाला नव्हता. पण तालुक्यातील नेसरी भागासह इतर ठिकाणी अवकाळी चांगलाच बरसला. तालुक्यात सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. तर ग्रामीण भागात पाऊस झाल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे

Unseasonal Rains
Unseasonal rain : राज्याला चांदा ते बांदा अवकाळीने झोडपले; शेतकरी हवालदील

भुदरगडच्या तुरंबे, सरवडे परिसरात अवकाळी

भुदरगडच्या तुरंबे, सरवडे परिसरालाही अवकाळीने झोडपले. रात्री नऊच्या दरम्यान येथे सुमारे तासभर विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी याचा फायदा होणार आहे.

ग्रामपंचायतीचे पत्रे उडाले

चंदगडचा करयादी भाग हा शुष्क भाग असून येथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथील कोवाड परिसराला शनिवारी अवकाळीने झोडपून काढले. येथे वादळी वाऱ्यांमुळे तेऊरवाडी ग्रामपंचायत इमारतीवरील पत्र्याचे शेड उडून पडले. ते शेजारच्या मारुती पाटील यांच्या घरावर पडल्याने त्यांच्या घराचे चार लाखांचे नुकसान झाले.

नानीबाई चिखलीत लाखोंचे नुकसान

कागलच्या नानीबाई चिखली परिसरात झालेल्या विजेच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसामुळे लाखोंचे नुकसान झाले. येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सहा-सात घरांचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. तर चिखली - कोडणी रोडवरील बेनाडे वस्तीवर असणाऱ्या तीन घरांवर शेड पडल्यामुळे तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

आजऱ्यात पाणीच पाणी, कोसळली वीज

गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या अवकाळीने आजऱ्यासह उत्तूर परिसरातही दोन तास तळ ठोकला. यामुळे येथील शेतवडीत पाणीच पाणी झाले होते. आजरा शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पाच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. आजरा सूतगिरणीजवळ ३३ केव्हीच्या उच्च दाबाच्या वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आजरा शहरासह ६० गावे अंधारात गेली होती. तर हाजगोळी खुर्द येथील येथील आनंदा दत्तू हरेर यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडांवर वीज पडल्याने झाडांनी पेट घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com