बारामती येथे धान्य महोत्सवास प्रारंभ
बारामती येथे धान्य महोत्सवास प्रारंभ 
मुख्य बातम्या

बारामती येथे धान्य महोत्सव सुरू

टीम अॅग्रोवन

बारामती, जि. पुणे  ः मशरूमचे लोणचे, पापडापासून ते गुळपट्टीपर्यंत आणि शरबती गव्हापासून ते हातसडीच्या तांदळापर्यंत अशा विविध धान्य व पदार्थांनी येथील बाजार समितीचे रयत भवन सजले. रसायन अवशेषमुक्त अन्नाची संकल्पना राबवत शुक्रवारपासून (ता. १२) येथे धान्य महोत्सव सुरू झाला.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या धान्य महोत्सवास शुक्रवारपासून येथील रयत भवन येथे सुरवात झाली. हा धान्य महोत्सव रविवारपर्यंत (ता. १४) सुरू राहणार आहे. अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग, ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, विष्णुपंत हिंगणे, राजीव देशपांडे, बाजार समितीचे सभापती शौकत कोतवाल, उपसभापती शशिकला वाबळे, सचिव अरविंद जगताप, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली महोत्सव प्रारंभप्रसंगी उपस्थित होते.

या वेळी त्यांनी महोत्सवात सहभागी धान्य उत्पादक, महिला शेतकरी गट, सेंद्रिय शेतकरी गट, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. महोत्सवात पुणे जिल्ह्यासह बीड, सोलापूर, सातारा, वर्धा, सांगली जिल्ह्यांतून विविध उत्पादक सहभागी झाले आहेत. या वर्षीच्या धान्य महोत्सवात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने सहभागासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश स्टॉल हे सेंद्रिय उत्पादनांचे आहेत. डॉ. लाखनसिंग यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT