बियाणे दराचा पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला
बियाणे दराचा पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला  
मुख्य बातम्या

बियाणे दराचा पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला

टीम अॅग्रोवन

नागपूर : या वर्षी नाही, परंतु पुढच्या वर्षीच्या हंगामात निश्‍चितच बियाणे कंपन्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्‍वासन देत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी नॅशनल सीड असोसिएशनच्या प्रतिनिधींचा दरासंदर्भातील प्रस्ताव फेटाळला.

बीटी बियाणे दरात केलेल्या कपातीचा पुनर्विचार करण्याची मागणी करीत नॅशनल सीड असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्र्यांची बुधवारी (ता. १४) दिल्लीत भेट घेतली. नॅशनल सीड असोसिएशनचे कार्यकारी संचालक कल्याण गोस्वामी, समीर मुळे, कावेरी सीड कंपनीचे भास्कर राव, अंकुर सीड कंपनीचे संचालक माधव शेंबेकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. सीड असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बीटी बियाणे दर ८०० रुपयांवरून ७४० करण्यात आले, त्यामुळे कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार असल्याचे कृषिमंत्र्यांना सांगितले. बीजोत्पादन, प्रक्रिया, तसेच याकामी लागणाऱ्या मजुरीच्या खर्चात वाढ झाली आहे, त्याची दखल घेत बियाणे दरात वाढ होणे अपेक्षित असताना शासनाने गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी कमी दराने बीटी बियाणे विकण्याची अधिसूचना काढली. ही बाब अन्यायकारक असल्याने बियाणे दराबाबत पुनर्विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली.

पुढील वर्षी कंपन्यांचे हित जपू बीजी- २ या कपाशी वाणाची विक्री या वर्षी ७४० रुपयांना होणार आहे, त्यात फेरबदल शक्‍य नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या हंगामात कंपन्यांच्या हिताचा नक्‍कीच विचार करून कंपन्यांसाठी दिलासादायक असा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन राधामोहनसिंग यांनी कंपन्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

‘नॅशनल सीड असोसिएशनने बियाणे दराबाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु या वर्षी त्यात फेरबदल शक्‍य नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या हंगामात बियाणे कंपन्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आम्ही आजही मोन्सँटोला देण्यात येणारे तंत्रज्ञान शुल्क रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत.’ - कल्याण गोस्वामी कार्यकारी संचालक, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया ‘६० रुपये दरात कपात करून काहीही साधले जाणार नाही. या वर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा फवारणीवर खर्च करावा लागेल. परिणामी दरात कपात करण्याऐवजी बोंड अळी प्रतिकारक कमी खर्चाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’ - श्रीकृष्ण ठोंबरे कापूस उत्पादक शेतकरी, कान्हेरी, जि. अकोला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT