CCI's cotton procurement stalled in Khandesh
CCI's cotton procurement stalled in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात सीसीआयची कापूस खरेदी रखडत 

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी रखडत सुरू आहे. कमी मजूर, अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे काही केंद्र सुरू तर काही बंद, अशी स्थितीदेखील आहे. खानदेशात सीसीआयचे जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर तालुक्‍यातील पहूर, शेंदूर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा येथे खरेदी केंद्र मंजूर आहेत. 

यातील जळगाव येथील केंद्र वगळता इतर केंद्र सुरू झाले आहेत. तर इतर केंद्रांमध्ये कमी मजूर व अधिकाऱ्यांची रजा आदी कारणांमुळे खरेदी रखडत सुरू आहे. मागील दोन दिवसांत खरेदी सुरू झाली आहे. २९ फेब्रुवारीनंतर खानदेशातील बहुसंख्य कापूस खरेदी केंद्र बंद झाले होते. कोरोना, घट, उताऱ्याच्या अडचणी यामुळे केंद्रधारक (जॉब वर्कर्स) कारखानदार खरेदी केंद्र सुरू करायला तयार नव्हते. लोकप्रतिनिधी, केंद्रीय मंत्री यांनी या अडचणींबाबत काही मुद्दे मार्गी लावले. यानंतर ही खरेदी सुरू झाली आहे. तीदेखील रखडत सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

जळगाव जिल्ह्यात पणन महासंघाची कापूस खरेदी मागील आठवड्यातच सुरू झाली असून, सुमारे १० हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी महासंघाने केली आहे. जिल्ह्यात कासोदा (ता. एरंडोल), पारोळा, दळवेल (ता. पारोळा), धरणगाव येथे कापूस खरेदी सुरू आहे. 

रोज २० वाहनांमधील कापसाचीच खरेदी  केंद्रात जेवढी वाहने येतील, त्यातील कापसाची खरेदी करण्याचे शासनाने म्हटले आहे. परंतु जिल्ह्यात सीसीआय व महासंघाच्या केंद्रात रोज फक्त २० वाहनांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. कोरोनामुळे गर्दी वाढू नये, सुरक्षित अंतर राखले जावे, यासाठी कापूस खरेदीबाबत मर्यादा घातल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT