मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर  Cats flood the river, water out of the container 
मुख्य बातम्या

मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. २३) झालेल्या अतिवृष्टीमुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले.

टीम अॅग्रोवन

निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी (ता. २३) झालेल्या अतिवृष्टीमुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आल्याने शनिवारी (ता. २५) सकाळी मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पाण्याच्या अतिप्रवाहामुळे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आहे. शिवाय जमिनीही खरडून गेल्या. तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  मागील काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. शिवाय या पावसामुळे तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणाचे बारा दरवाजे उघण्यात आल्याने मांजरा नदीपात्राच्या बाहेर पाणी पडले. मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीपात्राच्या बाहेर पाणी पडल्याने नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, तूर, ऊस या पिकाचे मोठे नुकसान झाले. पिके पाण्यात वाहून गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी या पाण्यामध्ये वाहून गेल्या असून, या पाण्याचा फटका निलंगा तालुक्यातील शेंद, निटूर, ढोबळेवाडी, बसपूर, शिरोळ-वांजरवाडा, गिरकचाळ, होसूर, नदीवाडी, हंचनाळ आदी गावांना बसला आहे. शिवाय मांजरा नदीला आलेल्या पुराचा फटका निलंगा, शिरूरअनंतपाळ व देवणी या तालुक्यांतील गावाना सर्वांधिक बसला आहे. कांही शेतकऱ्यांचे गोठ्यातील अवजारे वाहून गेली असून, पाण्याच्या अतिप्रवाहामुळे उसामध्ये पाणी जाऊन ऊस आडवा पडला आहे. या पाण्यामुळे गिरकचाळ येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला असून, रस्ता बंद झाला आहे. बसपूर-बाकली येथील पुलावरून पाणी पडल्याने शिरूरअनंतपाळ तालुक्याला जाणारा मार्ग बंद झाला.  माकणी (ता. लोहारा) येथील धरण भरण्याच्या मार्गावर असून, तेरणा नदीपात्रात कोणत्याही वेळी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय आधिकारी पाटबंधारे उपविभाग क्रमांक तीन लातूर यांनी दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच तालुका प्रशासनाने मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. नदीपात्राच्या पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व गावांना सतर्क राहावे, या बाबत पोलिस पाटील, तलाठी यांना सूचना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली. तालुक्यातील निलंगा, आंबुलगा, औरादशहाजानी, निटूर, पानचिंचोली, कासारसिरसी या महसूल मंडलात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. असाच उर्वरित पुढील दिवसांत पाऊस पडत राहिल्यास रब्बी हंगामाला हा पाऊस पोषक मानला जात आहे. मात्र सुरुवातीच्या काळात पेरणी झालेल्या खरीप हंगामातील सोयाबीन पीक काही भागांत काढणीला आले असून, याचे नुकसान होणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT