Ahilyanagar News: सहकारी संस्थांमुळे संगमनेर तालुक्याची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. तालुक्यात बँका व पतसंस्थांचे मोठे जाळे असून, त्यांच्यामध्ये सुमारे नऊ हजार कोटींच्या ठेवी आहेत. हे तालुक्याच्या आर्थिक समृद्धीचे लक्षण आहे. .ती आणखी वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर खुर्द (ता. संगमनेर) येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात थोरात बोलत होते..Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे.ते म्हणाले, बँकेने एक हजार एकशे तीस कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. हे सर्वांच्या कष्टाचे फळ आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात नसतील एवढ्या ठेवी आपल्या तालुक्यात आहे. ही बळकट अर्थव्यवस्था सहकारी संस्थांमुळे आहे. येथील कारखाना, दूध संघ, बाजार समिती, शैक्षणिक संस्था सर्व उच्च गुणवत्तेचे आहेत..Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत.निळवंडे धरण कालवे आपण पूर्ण केले. शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आणली. यामुळे अनेक पिढ्यांचे काम झाले आहे. हे काम करताना कोणीतरी कष्ट करतो आहे ध्यानात ठेवले पाहिजे. काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा. नाशिक-पुणे रेल्वेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. जमिनी अधिग्रहित केल्या..चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यातसुद्धा आले आणि सत्ता बदलल्यानंतर संगमनेर तालुक्याची रेल्वे पळवली गेली. आपल्याला तालुका एकसंध ठेवायचा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नसून वाईट प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्वांनी काम करावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.