Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसामुळे पाण्याची उपलब्धता असल्याने हरभऱ्याच्या पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत सरासरीच्या ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, अद्याप पेरणीचा कालावधी शिल्लक असल्याने यंदा सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ४९ हजार ६६७ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. .त्यात ज्वारीचे सर्वाधिक व त्यापाठोपाठ हरभरा, गव्हाचे क्षेत्र असते. रब्बीची स्थिती यंदा चांगली राहील अशी स्थिती आहे. अतिवृष्टी, पुराने जिल्ह्यातील अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. सतत महिनाभर पाऊस सुरू असल्याने अजून अनेक भागांत शेतीत पाणी साठून राहिलेले आहे. त्यामुळे अनेक भागांत वाफशाअभावी रब्बी पेरण्यांना अडथळे येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ५६.७१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे..Chana Sowing: हरभऱ्याचा विक्रमी पेरा; पेरणी सुरूच.अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पाण्याची स्थिती चांगली आहे. अर्थात, सततच्या पावसाने कापूस व अन्य पिकांची नासाडी झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे रब्बीतील पेरण्यांनाही उशीर होत आहे. रब्बीत प्रामुख्याने हरभरा, गहू, मकाचे क्षेत्र अधिक असते. गव्हाची साधारण डिसेंबरअखेरपर्यंत पेरणी होत असते. यंदासाठी गहू, हरभऱ्याची पेरणी सुरू झाली आहे. दोन्हीही पिकांची महिनाभरात मोठ्या प्रमाणात पेरणी होईल, असे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.सध्या हरभऱ्याच्या पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे १ लाख ८ हजार ३४६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे..हरभऱ्याची साधारण डिसेंबरअखेरपर्यंतपेरणी होऊ शकते. अजून अनेक भागांत वाफसा नाही. आतापर्यंत हरभऱ्याची ५८ हजार ३८ हेक्टर क्षेत्रावर (५३.५६ टक्के) पेरणी झाली आहे.यंदा साधारण सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पेरणीचा कृषी विभागाचा अंदाज असून त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. नेवासा तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक हरभऱ्याची पेरणी झाली आहे. अहिल्यानगर, राहाता,जामखेड तालुक्यातही बऱ्यापैकी हरभरा पेरला आहे..Chana Sowing: बीजप्रक्रियेनंतरच करा हरभरा पेरणी.तालुकानिहाय हरभऱ्याची पेरणीपेरणी झालेले क्षेत्र (कंसात सरासरी क्षेत्र)अहिल्यानगर ः ७७२९ (११३४५)पारनेर ः ३५६४ (८१२०)श्रीगोंदा ः २४६३ (६०३९)कर्जत ः ६१४३ (१५,६१४)जामखेड ः ५२४२(८३६५)शेवगाव ः ४२७० (७२००).पाथर्डी ः ६३४८ (११,५००)नेवासा ः ५४८९ (४४८५)राहुरी ः १२५० (३५००)संगमनेर ः ३९१० (६१८९)अकोले ः १८९० (३५५७)कोपरगाव ः १५५६ (५८८२)श्रीरामपूर ः १०८४ (५५१०)राहाता ः ७०९६ (११०५९).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.