Campaign to increase sugarcane productivity to 125 tons per hectare in Kolhapur district! 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ अभियान!

कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने तीन वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ बनविण्यात येणार आहे. ऊस उत्पादन हेक्टरी १२५ टनांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतील. ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ अभियान’ या नावाने हे अभियान असणार आहे.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने तीन वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ बनविण्यात येणार आहे. ऊस उत्पादन हेक्टरी १२५ टनांपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतील. ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ अभियान’ या नावाने हे अभियान असणार आहे. 

याबाबतची बैठक पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्यात याबाबत चर्चा झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक तथा रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश कबाडे व कृषिरत्न पुरस्कार प्राप्त संजीव माने, पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी संशोधक सुरेश माने तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रगतिशील शेतकरी, कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ‘‘हेक्टरी कमी ऊस उत्पादन घेणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. यासाठी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा. कृषीसह संचालक उमेश पाटील यांनी अभियानाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगली, सातारा हे ऊस पिकाच्या उच्चतम उत्पादकतेसाठी जगातील सर्वाधिक अनुकूल भाग आहे. सध्या तिन्ही जिल्ह्यांची उसाची उत्पादकता सरासरी १०० टन प्रति हेक्टरपेक्षाही कमी आहे. विविध उपाय अवलंबिल्यास हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादन काढता येईल.’’

रामेतीचे सहायक संचालक ज्ञानदेव परीट यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी ऊस उत्पादकता वाढ अभियान बैठकीत प्रगतिशील शेतकरी, कृषी व बँक अधिकारी तसेच ठिबक व खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ऊस उत्पादनात हेक्टरी वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. 

तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय

  •   जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय, गांडूळ व हिरवळीच्या खतांचा वापर वाढविणे आवश्यक.     
  •   ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी नियोजन व्हावे.   
  •   उत्पादकता कमी असणारे तालुके व शेतकऱ्यांवर अभियानाचा विशेष भर असावा.
  •   सरींमधील अंतर ४ फुटांपर्यंत वाढवणे.
  •   तांबेरा व अन्य रोग न येणाऱ्या ऊस जातींची निवड करणे 
  •   रोपांच्या मुळापर्यंत खत देणे.
  •   पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून बियाणे, प्रशिक्षण व तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य होणार
  •   शेतकऱ्यांकरिता पीक स्पर्धा घ्याव्यात. प्रोत्साहनपर अतिरिक्त पतपुरवठा व्हावा.
  •   पूर बाधित क्षेत्रात ऊस व्यवस्थापन व्हावे. सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांनी शेती पद्धतीत काही बदल करणे आवश्यक आहे. ‍जिल्ह्यात हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. - सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

    Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

    Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

    Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

    APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

    SCROLL FOR NEXT