Came on the market in October 31.13 lakh bales of cotton 
मुख्य बातम्या

ऑक्टोबरमध्ये बाजारात आला ३१.१३ लाख गाठी कापूस 

कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात कापूस आवकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे ः कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात कापूस आवकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ३१.१३ लाख गाठी कापसाची आवक झाली. एक कापूस गाठी १७० किलोची असते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये २७.१६ लाख गाठी कापूस आवक झाली होती, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) म्हटले आहे. देशात यंदा ३६०.१३ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज सीएआयने व्यक्त केला आहे.  ऑक्टोबरमध्ये बाजारातील आवक ३१.१२ लाख गाठी, एक लाख गाठी आयात आणि मागील हंगामातील शिल्लक ७५ लाख गाठी, असा एकूण कापसाचा पुरवठा १०७.१२ लाख गाठींवर झाला. तर ऑक्टोबरमध्ये कापूस वापर २७.९१ लाख गाठींचा झाला. तर निर्यात ४ लाख गाठींची झाली. ऑक्टोबरमधील वापर आणि निर्यात वगळता देशात ७५.२१ लाख गाठी कापसाचा साठा आहे. यापैकी मिल्सकडे ४६.२१ लाख गाठी कापूस आहे. मिल्सच्या गोडाउनमध्ये असलेला कापूस त्यांची सरासरी दैनंदिन गरज ५० दिवस भागवेल एवढा आहे. तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र कापूस पणन महामंडळ, बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापारी, जिनिंग आणि एक्चचेंज प्लॅटफॉर्म्सकडे २९ लाख गाठी कापूस साठा आहे. सूतगिरण्या आणि स्टॉकिस्ट यांनी खरेदी केलेला मात्र कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि कापूस पणन महामंडळाच्या गोडाउनमध्ये असलेला कापूस धरून ७५.२१ लाख गाठींचा देशात साठा आहे, असेही सीएआय म्हटले आहे.  कापसाचे दर यंदा अधिक  देशात कापसाचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. गुजरातमध्ये काही बाजार समित्यांत गेल्या हंगामात कापसाचा दर प्रति क्विटंल ४ हजार ३५५ रुपये होतो. तो सध्या ८ हजार ४०५ रुपयांवर पोचला आहे. पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटकातही कापसाला आठ हजार ते साडेआठ हजारांच्या दरम्यान दर मिळत आहे.  असे राहील राज्यनिहाय उत्पादन (लाख गाठी)  गुजरात---९६.९९  महाराष्ट्र---८६.४६  तेलंगणा---४५.९१  राजस्थान---२६.६७  कर्नाटक---२५.५५  मध्य प्रदेश---२०.५०  हरियाना---१६.६०  आंध्र प्रदेश---१४.३०  पंजाब---१०.०७  (एक कापूस गाठ १७० किलो)  ऑक्टोबरमधील राज्यनिहाय कापूस आवक (लाख गाठींत)  गुजरात--- ७.६५  महाराष्ट्र--- ४.०६  तेलंगणा---२.७५  राजस्थान--- ५.१३  कर्नाटक--- २.७५  मध्य प्रदेश--- २.६८  हरियाना--- १.८१  आंध्र प्रदेश--- १.९०  पंजाब--- १.२८  (एक कापूस गाठ १७० किलो)   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT