Buy cashew nuts at the rate of Rs 120 in Sindhudurg
Buy cashew nuts at the rate of Rs 120 in Sindhudurg 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्गात काजू बी प्रतिकिलो १२० रुपये दराने खरेदी

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग ः काजू बागायतदारांकडून काही दलाल ८० ते ८५ रुपये दराने काजू बी खरेदी करून बागायतदारांची फसवणूक करीत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी काजू बी प्रतिकिलो १२० रुपये दर निश्‍चित करून दोडामार्ग शेतकरी संघटनेने काजू बी खरेदीला उसप (ता. दोडामार्ग) मधून खरेदीला प्रारंभ केला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १ हजार किलो काजू खरेदी करण्यात आल्या. शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे काजू बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात काजू हंगामातच देशभरात ‘कोरोना’ संसर्ग सुरू झाला. त्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. याचाच फायदा काही काजू खरेदी करणाऱ्या दलालांनी घेण्यास सुरुवात केली. काजू बीचा प्रतिकिलो १४० रुपये दर ‘कोरोना’चे कारण पुढे करीत प्रतिकिलो ८० ते ८५ रुपयांवर आणला.अजूनही दर कमी होणार अशी भीती पसरवून खरेदी करण्याचे काम जिल्ह्यात सुरू होते. त्यामुळे प्रतिकिलो ६० ते ७० रूपये दर कमी झाल्यामुळे बागायतदारांची झोपच उडाली.

दरम्यान या संदर्भात पालकमंत्री उदय सांमत यांनी आंबा, काजूच्या दराबाबत वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथे बैठक घ्यावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार तहसीलदार प्रवीण लोकरे याच्या प्रमुख उपस्थितीत काजू कारखानदार, व्यापारी, बागायतदार यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्र कॅश्‍यू मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे दोडामार्ग, बांदा भागातील काजू बी करिता १०० रूपये, कणकवली -९० रूपये, तर वेंगुर्ला व इतर भागातील काजू करिता प्रतिकिलो ८५ रूपये दर निश्‍चित करण्यात आला असल्याचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी सभेत स्पष्ट केले. यावेळी काजू बागायतदार नितीन कुबल आणि जयप्रकाश चमणकर यांनी प्रतिकिलो १२० रूपये दर मिळावा, अशी मागणी केली.

संयम बाळगा चांगला दर मिळेल दरम्यान शेतकऱ्यांची काजू बी खरेदीत होणारी फसवूणक टाळावी आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा या हेतूने दोडामार्ग शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला आहे. काजू बागायतदारांनी डगमगू नये. थोडा संयम बाळगल्यास आणखी चांगला दर काजूला मिळेल. गेल्यावर्षी काजूला १८० रुपये दर होता. यावर्षी सुरुवातीला १४० रुपये दर होता. परंतु ‘कोरोना’चे कारण पुढे करीत काही लोक फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे थांबविण्यासाठीच शेतकरी संघटनेने हे पाऊल उचलले असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत आणि सदस्य चंद्रशेखर देसाई यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT