बिबट्याच्या हल्ल्यात दांपत्य जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात दांपत्य जखमी  
मुख्य बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी दांपत्य जखमी

टीम अॅग्रोवन

पिंपळगाव हरेश्‍वर, जि. जळगाव ः कामासाठी शेतात गेलेल्या चव्हाण दांपत्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना नुकतीच कवली शिवारात घडली.  वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथील शेतकरी भारत सरिचंद चव्हाण (वय ३०) यांची मुरडेश्वर खोऱ्यालगत कवली (ता. सोयगाव) शिवारात शेती आहे. रविवारी (ता. २१) शेतकरी भारत चव्हाण व त्यांची पत्नी मनीषा भारत चव्हाण (वय २५) या निंदणीच्या कामासाठी आपल्या लहान दोन मुलांसह शेतात गेले होते. तण नियंत्रणाचे काम ते करीत होते. त्यांनी नजीकच्या झाडाला झोक्‍यात बाळाला झोपविले होते. बाळाला झोका देण्यासाठी मनीषा गेल्या. त्या वेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. पत्नीची आरडाओरड ऐकून भरत चव्हाण हे पत्नीला वाचविण्यासाठी गेले असता, बिबट्याने मनीषा हिला सोडत भरत चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. बिबट्याच्या या हल्ल्यात भरत चव्हाण यांच्या डोळ्याखाली, उजवा हात व पोटावर जबर जखमा, तर मनीषा चव्हाण यांच्या खांद्याला जबर जखमा झाल्या आहेत. मनीषा चव्हाण यांनी आरडाओरड केली. मग गुराखी व शेतकरी विष्णू प्रल्हाद पाटील, मनोज सुभाष पाटील हे एकत्र आले. त्यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे चव्हाण दांपत्याचे प्राण वाचले. या घटनेतील जखमी चव्हाण हे अल्पभूधारक असून, घरची शेतीकामे आटोपून ते मोलमजुरी करतात. जखमींवर सुरवातीला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले व नंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रुग्णालयात हालविण्यात आले आहे. या परिसरात वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरात होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT