Shet-tale
Shet-tale 
मुख्य बातम्या

मागेल त्याला शेततळे योजनेला शासनाचा ब्रेक 

सुर्यकांत नेटके

नगर ः राज्यात राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेला यंदाच्या नव्या वर्षात सरकारने ब्रेक दिला आहे. यंदाच्या वर्षात अर्थसंकल्पीय निधीत केवळ ३३ टक्केच निधी उपलब्ध होण्याची शक्यता रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नव्या वर्षात मागेल त्याला शेततळे योजनेतून नवीन कामे सुरु करु नयेत व नवीन शेततळ्याची आखणी करुन देऊ नये, असे आदेश कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोनाचा पहिला फटका कृषीच्या मागेल त्याला शेततळे योजनेला बसला असल्याचे दिसत आहे.  राज्यातील बहुतांश भागाला मागील काळात दुष्काळाचा फटका बसला. त्यामुळे दुष्काळी भागात पाणी साठवण करुन कमी पाण्यात शेतपीके घेण्यासाठी राज्यात मागेल त्याला शेततळे योजना राबवली जात आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान दिले जात असल्याने दरवर्षी राज्यभरातील साधारण पन्नास हजार शेतकरी या योजनेतून शेततळे करण्यासाठी अनुदान मागणी करतात. यंदा मात्र राज्यात कोरोनाचे संकट आले आणि त्याचा पहिला फटका कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेला बसला असल्याचे दिसत आहे. सरकारने या योजनेच्या कामाला ब्रेक लावला आहे.  यंदाच्या वर्षात अर्थसंकल्पीय निधीत केवळ ३३ टक्केच निधी उपलब्ध होण्याची शक्यतेनुसार कृषी आयुक्तांनी बुधवारी (ता. ६) राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्र देऊन मागेल त्याला शेततळे जनतेतून नवीन कामे सुरु करु नयेत, नवीन कामाची आखणी करुन देऊ नये, असे पत्र दिले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात शेततळ्याची कामे होण्याची शक्यता नाही हे स्पष्ट झाले आहे.  नगर जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंत ५५ हजार ९२० शेतकऱ्यांनी शेततळ्याची मागणी केली असून त्यातील ४५ हजार ९५५ शेतकरी योजनेला पात्र आहेत. ३४ हजार ४३४ शेतकऱ्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. २४ हजार शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश दिलेले आहेत. त्यातील पंधरा हजार ७२१ कामे झालेली असून उर्वरित शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT