खानापूर- पिंगळी रस्त्यावरील बलसा येथे विना परावाना पीकवाढ संवर्धके, वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करणार्ऱ्या ठिकाणावर छापा टाकण्यात आला.
खानापूर- पिंगळी रस्त्यावरील बलसा येथे विना परावाना पीकवाढ संवर्धके, वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करणार्ऱ्या ठिकाणावर छापा टाकण्यात आला.  
मुख्य बातम्या

बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा साठा परभणीजवळ जप्त

टीम अॅग्रोवन

परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (पीजीआर), वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करून पॅंकिंवर विविध कंपन्यांचे लेबल लावून विक्री करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखा तसेच कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत २८ लाख ७६ हजार ९१० रुपये किमतीची रसायने, विविध कंपन्यांचे लेबल्स तसचे अन्य साहित्यांचा साठा जप्त करण्यात आला. शनिवारी (ता.२१) या प्रकरणी दोन जणांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. परभणी शहरातील खानापूर -पिंगळी रस्त्यावरील बलसा या गावात गेल्या वर्षभरापासून विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके, वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी (ता. २०) दुपारी चारच्या सुमारास याठिकाणावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे यांच्या पथकाने छापा टाकला. छाप्यात राज्यातील विविध ठिकाणच्या कंपन्यांच्या नावाचे लेबल लावलेल्या पीकवाढ संवर्धके तसेच वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा साठा, रसायने, लेबल्स सह अन्य साहित्य आढळून आले.  शनिवारी (ता. २१) सकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत कीटनाशके, रसायने, लेबल एकूण २८ लाख ७६ हजार ९१० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात फौजदार एस. ए. गोपीनवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माधव केंद्रे (रा. वाघदरवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) आणि गीता सुर्यवंशी (रा. भाग्यनगर, परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पीकवाढ संवर्धके तसेच कीटकनाशकांचे नमुने काढण्यात आले असून प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे उपविभागीय अधिकारी सागर खटकाळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT