नागुढाणामधील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूसदृश लक्षणे नाहीत Birds in Nagudhana do not have bird flu-like symptoms
नागुढाणामधील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूसदृश लक्षणे नाहीत Birds in Nagudhana do not have bird flu-like symptoms 
मुख्य बातम्या

नागुढाणामधील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूसदृश लक्षणे नाहीत

टीम अॅग्रोवन

अमरावती  : धारणी तालुक्यातील नागुढाणा या गावातील पोल्ट्री फार्ममधील काही पक्षी मृत आढळले. त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या  पथकानेही तिथे जाऊन तपासणी केली. त्यावेळी बर्ड फ्लूसदृश लक्षणे आढळून आली नाहीत, असे पथकप्रमुख तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी स्पष्ट केले.

डॉ. रहाटे म्हणाले, ‘‘येथील पाच पक्ष्यांचे पोस्टमार्टम केले. त्यात पक्ष्यांना श्वसनसंस्थेशी संबंधित आजार आढळून आला. बर्ड फ्लूबाबत लक्षणे सकृतदर्शनी आढळत नाहीत.  अद्यापपर्यंत जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू सदृश स्थिती आढळली नाही. पूर्णपणे उकडलेले मांस व अंडी खाणे सुरक्षित आहे. अद्ययावत माहिती व शंकानिरसनासाठी १८००२३३०४१८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कुक्कुटपालकांनी जैवसुरक्षा राखावी : जिल्हाधिकारी जिल्ह्यात अद्यापपर्यंत बर्ड फ्लूसदृश स्थिती आढळलेली नाही. तरीही पूर्वदक्षता घेतली गेली पाहिजे. कुक्कुटपालकांनी फार्म व परिसराची जैवसुरक्षा राखली जाईल, याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी दिले. जिल्हाधिकारी नवाल यांनी या बाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आदेश दिले. जिल्ह्यात कुठेही मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मांसाचे अवशेष उघड्यावर न फेकता त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. मांस व पंख इतरत्र पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. मृत पक्ष्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. पक्षिघर व आवारातील फवारणीसाठी धुण्याचा सोडा, सोडिअम हायपोक्लोराईट, फोरमॅलिन वापरावे. निर्जंतुकीकरण नियमित करावे. तेथील सर्व व्यक्तींनी स्वत:ही स्वच्छता राखावी. जलाशये, पाणस्थळावर निगराणी ठेवून स्थलांतरित पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, आदी निर्देश त्यांनी दिले.

भंडाऱ्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नाही भंडारा : लाखनी तालुक्यातील पालांदुर येथील धनंजय भुसारी यांचे पोट्री फार्म वर मंगळवारी (ता.१२)  रोजी कोंबडयांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने तेथील तीन मृत पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्लू रोगाच्या निदानाकरिता भोपाळ येथील हाय सेक्युरिटी ॲनिमल डीसिज लॅब येथे पाठविण्यात आले होते. त्यांचे अंतिम रोग निदानाचे निष्कर्ष जिल्हा स्तरावर प्राप्त झाले असून, सदर पक्षी बर्ड फ्लू रोगाने बाधित नसल्याचे निष्पन्न झालेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT