कर्जमाफी
कर्जमाफी 
मुख्य बातम्या

कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू

Raj Chougule

कोल्हापूर: कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बॅंकांकडून मागविली आहे. यामुळे सोमवार(ता. २३)पासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातून २ लाख ७० हजार ५९० शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी अर्ज आले अाहेत. या अर्जांपैकी १७ हजार ६२० शेतकऱ्यांना अपात्र ठरविले अाहे.  कर्जमाफीचा २ लाख ५२ हजार ९७० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा बॅंकांत ५३ हजार २६२ थकबाकीदार आहेत. २२३ कोटी १७ लाखांची थकबाकीची रक्कम आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण बॅंकांमधील ५४ हजार ७२९ थकबाकीदार आहेत. याचे ६५ कोटी १३ लाख रुपये थकीत आहेत. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील एकूण १ हजार ८४७ विकास कार्यकारी सहकारी संस्थांमधील २ लाख ५२ हजार ९७० सभासदांना मिळणार आहे. शासनाने केलेल्या छाननीत कोल्हापुरातील १७ हजार ६२० शेतकरी कर्जमाफीला अपात्र ठरले. अपात्र ठरलेल्यांची यादी वगळून टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जात आहे. त्याच यादीनुसार कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा केली जाईल. दरम्यान, पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या यादीची बॅंक व शाखानिहाय फोड करून ही रक्कम ज्या त्या शेतकऱ्याच्या नावावर जमा केली जाणार अाहे. दरम्यान, ही यादी पाठविण्यासाठी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटीदिवशीही कार्यालयात हजेरी लावून ही प्रक्रिया पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना या रक्कमेचा लाभ मिळू शकेल, अशी शक्‍यता उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी व्यक्त केली. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांत नाराजीचा सूर  शासनाने पहिल्या टप्प्यातील काही शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. मात्र यामध्ये अद्याप काही ग्रामपंचायतींची नावे या यादीत नाहीत. अनेक गावांमध्ये पाच ते दहा शेतकरी इतक्‍या नगण्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांतून कर्जमाफीबाबत फारसे समाधान नसल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. कर्जमाफीच्या कालावधीच्या निकषात बसत नसल्याने अनेक ऊस उत्पादकांनाही याचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT