Be careful when buying seeds, fertilizers, pesticides
Be careful when buying seeds, fertilizers, pesticides 
मुख्य बातम्या

अकोला : बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना काळजी घ्या 

टीम अॅग्रोवन

अकोला : यंदाच्या खरिपासाठी बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करतांना शेतकऱ्यांनी प्रमाणित मान्यताप्राप्त कंपन्यांचे व अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

कृषी निविष्ठाबाबत अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३ ४००० यावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे. 

कृषीनिविष्ठा खरेदी करताना अशी घ्या काळजी 

  • गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्या 
  • अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा 
  • खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन/ पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे 
  • भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकीटे सिलबंद / मोहोरबंद असल्याची खात्री करा 
  • बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतिम मुदत पाहून घ्या 
  • कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा 
  • कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT