banana
banana  
मुख्य बातम्या

फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा बहिष्कार

टीम अॅग्रोवन

जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी पिकासाठी मानके (परतावा निकष) बदलल्याने जिल्ह्यातील अनेक केळी उत्पादकांनी या योजनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. या भूमिकेला अनेक शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून, फक्त पाच हजार शेतकऱ्यांनी या योजनेत बुधवारपर्यंत (ता. २८) सहभाग घेतला आहे.  थंडी व तापमानासंबंधी हेक्टरी सात हजार व वादळ आणि गारपिटीसंबंधीच्या विमा संरक्षणासाठी हेक्टरी दोन हजार ३६३ रुपये विमा हप्ता भरला जात आहे. विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांची कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) पसंती आहे. बँकेतही काही कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून विमा संरक्षण घेतले आहे. विमा हप्ता भरण्यासंबंधी धरणगाव, जळगाव, चोपडा, जामनेर या तालुक्यात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. परंतु यावल, रावेर, मुक्ताईनगर या भागांत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.  विमा संरक्षण घेऊनही नुकसान झाल्यानंतर परतावे मिळण्याची शक्यता कमी आहे. परतावे मिळू शकणार नाहीत, यामुळे शेतकऱ्यांनी मानके बदलण्यासाठी सुमारे तीन महिने राज्य सरकार व केंद्रातील मंडळींकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाने  शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही. यामुळे या योजनेला यंदा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

केवळ पाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी (२०१९-२०) ४५ हजार केळी उत्पादकांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. ५४ हजार हेक्टर क्षेत्रासाठी हे विमा संरक्षण घेण्यात आले होते. यंदा ३१ ऑक्टोबरपर्यंत विमा हप्ता भरण्याची मुदत आहे. ही मुदत येत्या शनिवारी संपणार आहे. आतापर्यंत फक्त पाच हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. तर आणखी पाच ते सहा हजार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात, असा अंदाज आहे. अर्थातच यंदा फक्त ११ ते १२ हजार शेतकरी या योजनेत सहभागी होतील, अशी स्थिती आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT