केळी वाळली
केळी वाळली 
मुख्य बातम्या

पाणीटंचाईसह उष्णतेमुळे केळी बागा धोक्यात

टीम अॅग्रोवन

अकोला ः उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील पणज मंडळातील केळी बागांना मोठा तडाखा बसला आहे. पाणी पातळी खोल गेल्याने आधीच शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. त्यातच आता हे उष्णतेचे संकट केळी उत्पादकांना मारक ठरले आहे.  मागील काही वर्षांपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. अशाही स्थितीत शेतकरी असलेल्या पाण्याचा योग्य वापर करून केळीसारखे पीक या मंडळात विविध गावांमध्ये घेताना दिसतात. दरवर्षी नवीन केळीची लागवडसुद्धा होत असते. यावर्षी पणज व बोचरा परिसरात आधीच पाण्याची पातळी खालावलेली आहे. अनेक बोअरवेल्स निकामी झाल्या. पाणीटंचाई आणि आता उन्हाच्या झळा वाढल्याने केळीचे पीक मोठ्या अडचणीत सापडले आहे. अकोला जिल्ह्यातील पणज तसेच बोचरा परिसरात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. या पिकासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. या गावांमधील शेतकऱ्यांनी केळीची लागवड करण्यासाठी लाखोंचा खर्चसुद्धा केला. परंतु यावर्षी हे शेतकरी कधी नव्हे इतक्या मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. पाणीटंचाई, उष्ण वातावरणामुळे केळीच्या झाडांवरील पाने सुकली आहेत. त्यामुळे केळीच्या घडांवर परिणाम झाला. अशा स्थितीत केळीचे दरही स्थीर नाहीत. शेतकऱ्यांनी आधी पाणी समस्या सोडविण्यासाठी विहिरी खोल्य केल्या. काहींनी बोअरवेल्सची खोली वाढविली. ठिबक यंत्रणा बसविली. एवढे सारे करूनही बागेला पुरेशे पाणी देणे शेतकऱ्यांना सध्या शक्य राहलेले नाही. आता उन्हाचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असून येत्या काही दिवसांत ते 44 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोचण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे येत्या दोन ते अडीच महिन्यांत केळी बागा कशा जगवून ठेवायच्या, हा मोठा पेच शेतकऱ्यांना सतावत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT