Awareness among farmers about wide sari varamba method 
मुख्य बातम्या

रुंद सरी वरंबा पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

सुसरी (ता. भुसावळ) येथे नुकतेच जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे रुंद वरंबा सरी पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः सुसरी (ता. भुसावळ) येथे नुकतेच जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे रुंद वरंबा सरी पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रुंद वरंबा सरी पद्धतीच्या माध्यमातून पाण्याची बचत होते, अतिपावसातही पिके जोमात येतात. ओलावा टिकून राहतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा यांच्या अंतर्गत हरभरा पिकामध्ये रुंद सरी वरंबा पद्धत अवलंबून बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहे. सुसरी येथे त्यासंबंधी प्रात्यक्षिक घेतले आहे. त्याची माहिती देण्यात आली. रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करणारे शेतकरी अशोक पाटील यांनी आपले अनुभव सांगितले. श्री. पाटील यांनी रुंद वरंबा सरी तंत्राबाबत व हरभरा वाण विक्रम याविषयी समाधान व्यक्त केले. गावातील इतर शेतकऱ्यांनादेखील रुंद सरी वरंबा पद्धतीचा खरीप हंगामात वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

डॉ. तेलबिया संशोधन केंद्राचे तज्ज्ञ डॉ. भदाणे यांनी हरभरा पिकामधील उत्पन्न वाढीचे तंत्रज्ञान तसेच बीजोत्पादनाबाबत माहिती दिली. ‘आत्मा’चे उपसंचालक कुर्बान तडवी यांनी परिसरातील हरभरा पिकाची पाहणी करून रुंद सरी-वरंबा पद्धत शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे, असे सांगितले. यासोबतच शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा वर्ग आयोजिण्यासंबंधी आनंद व्यक्त केला.

कृषी विज्ञान केंद्रातील अभियंता वैभव सूर्यवंशी यांनी विशेष प्रयत्न करून सुसरी गावामध्ये रुंद सरी वरंबा पद्धतीचा प्रसार केला. त्याचे लाभ कसे मिळत आहेत, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत यानिमित्त पोचली. याबाबतही शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. गावातील शेतकरी विक्रम पाटील यांनी गटाच्या माध्यमातून बीजोत्पादन कार्यक्रम राबवला. रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करण्यासाठी ते पुढे आले. याबाबत त्यांचे कौतुक करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. विशाल वैरागर यांनी केले. प्रमोद जाधव यांनी सूत्रसंचालन यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषदेत शेतकरी नेते कडाडले

Agrowon Diwali Article: सुखी माणसाचा सदरा गवसतो तेव्हा...

Sugarcane Worker Issue: ऊस तोडणी कामगारांना फरक न दिल्यास संप

Development Project: मावळ तालुका कृषी विकासाचा आदर्श बनेल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Kolhapur Jaggery Price: कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे, मिळाला 'इतका' भाव

SCROLL FOR NEXT