Approval of tap water supply scheme for 178 villages in Paithan, Aurangabad taluka 
मुख्य बातम्या

पैठण, औरंगाबाद तालुक्यांतील १७८ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेला मान्यता

मुंबई : पैठण आणि औरंगाबाद तालुक्यांतील १७८ गावांतील ग्रीड पाणी पुरवठा योजनेला ‘जल जीवन मिशन’अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. ३०७ कोटी ६५ लाख रुपये किमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

मुंबई :  पैठण आणि औरंगाबाद तालुक्यांतील १७८ गावांतील ग्रीड पाणी पुरवठा योजनेला ‘जल जीवन मिशन’अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. ३०७ कोटी ६५ लाख रुपये किमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. 

या कामास मंत्रालयातील बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या बैठकीस पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

पैठण तालुक्यातील १७८ गावांतील लोकसंख्येचा विचार करून दरदिवशी ५५ लिटर दरडोई असा निकष लावला आहे. यासाठी ६ हजार २७२ इतका दरडोई खर्च व सूट असे धरून दरडोई खर्च १ हजार ६६५ रुपये असलेल्या गावांना ही नळपाणी योजना प्रस्तावित होती. या योजनेसाठी ३०७ कोटी ६५ लाख खर्च येणार आहे. या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शर्तीची पूर्तता करण्याच्या अटीवर मान्यता दिली. ही योजना तातडीने पूर्णच करण्याची सूचना पाटील यांनी दिली.

वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या कामास लवकरच सुरुवात होईल. पैठण आणि औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावांतील लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी आशा आहे. ही योजना तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी सूचना दिल्याने लवकर पाणी मिळेल. -  संदीपान भुमरे, रोजगार हमी योजना मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT