Approval for purchase of sorghum at base price 
मुख्य बातम्या

आधारभूत किमतीने ज्वारी खरेदीस मंजुरी

राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीसाठी जिल्हानिहाय खरेदीचे उद्दिष्ट विभागून देत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीसाठी जिल्हानिहाय खरेदीचे उद्दिष्ट विभागून देत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनकडून ७० हजार ७६० क्विंटल ज्वारी खरेदी केली जाणार आहे.

राज्यात किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत ज्वारी खरेदी योजना कार्यान्वित करण्यास २ जून २०१९ च्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली आहे. २०२० -२१ मध्ये केंद्र शासनाने ज्वारी खरेदीसाठी मंजूर केलेला इष्टांक विचारात घेता ज्वारी खरेदी प्रक्रिया जलदगतीने व निर्धारित कालावधीत होण्यासाठी ज्वारी खरेदी करिता मार्केटिंग फेडरेशनला ७० हजार ७६० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३ जूनपासून ३० जून अखेरपर्यंत ज्वारी खरेदीची प्रक्रिया चालणार आहे. निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त खरेदी होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याची सूचनाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात १० जिल्ह्यांत किमान आधारभूत किमतीने ज्वारी खरेदी होण्यासाठी २९ हजार ८६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्या उद्दिष्टानुसार अकोला जिल्ह्यासाठी २६० क्विंटल औरंगाबाद ५०० क्विंटल, बीड १० हजार क्विंटल, बुलडाणा १३ हजार ५०० क्विंटल, धुळे ११ हजार क्विंटल, जळगाव २५ हजार ५०० क्विंटल, जालना ५५०० क्विंटल, नंदुरबार १ हजार क्विंटल, नाशिक १५०० क्विंटल तर यवतमाळ जिल्ह्यासाठी २ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT