वाशीम ः एकनाथराव डवले यांना निवेदन देऊन चर्चा करताना शेतकरी कंपनी संघाचे पदाधिकारी.
वाशीम ः एकनाथराव डवले यांना निवेदन देऊन चर्चा करताना शेतकरी कंपनी संघाचे पदाधिकारी. 
मुख्य बातम्या

शेतकरी कंपन्यांच्या मागण्यांसाठी अप्पर मुख्य सचिवांना साकडे

टीम अॅग्रोवन

अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांना केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांमध्ये प्राधान्य मिळावे, अशी मागणी वाशीम जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघातर्फे राज्याचे कृषी व जलसंधारण खात्याचे अप्पर मुख्य सचिव एकनाथराव डवले यांच्याकडे करण्यात अाली. शनिवारी (ता. ८) श्री. डवले हे वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन निवेदन दिले.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अाणि राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानामध्ये बीजोत्पादन अाणि वितरणासाठी महाबीज व इतरांना घेतलेले अाहे त्याप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना हेच नियम लागू करावेत, केंद्र शासनाच्या सीड हबसाठी अनुदान मापदंडाप्रमाणे जे खासगी उद्योगांना लागू अाहेत, ते शेतकरी उत्पादक कंपन्यांना मापदंड लागू करावेत, कृषी विद्यापीठ, राष्ट्रीयकृषी संशोधनसंस्था यांच्याकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना ब्रीडर सीड मंजूर व्हावे, दहा वर्षाच्याअातील व बाहेरील ज्या वाणांच्या बियाण्याला जास्त मागणी अाहे, अशा प्रमाणित, पायाभूत बियाण्याला उत्पादन अनुदान मिळावे, बीबीएफ पेरणी तंत्रज्ञानाला शासकीय स्तरावरून पुन्हा प्रोत्साहन द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँका, नाबार्डकडून शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी सेवा सहकारी सोसायट्या पतपेढ्यांना कर्जपुरवठा केला जातो त्याच धर्तीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांना वित्तपुरवठा करावा, जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी मॉल उभारण्यासाठी मदत करावी, अशा प्रकारच्या विविध मागण्यांचे निवेदन वाशीम जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघाचे अध्यक्ष दिलीप ना. फुके, उपाध्यक्ष पंजाबराव अवचार, सचिव विलास गायकवाड यांच्या नावे श्री. डवले यांना देण्यात अाले.  या वेळी शेतकरी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी डवले यांच्याशी मागण्यांबाबत सविस्तर चर्चाही केली. या वेळी गजानन अवचार, शिवाजी भारती, ज्ञानेश्वर ढेकळे, शेतकरी उत्पादक कंपनीचे सीईअो रवींद्र बोडखे, सुनील अोव्हर यांच्यासह इतर उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT