चिंताजनक अर्थव्यवस्थेचा  कृषी क्षेत्रावर परिणाम : पाटील
चिंताजनक अर्थव्यवस्थेचा कृषी क्षेत्रावर परिणाम : पाटील 
मुख्य बातम्या

चिंताजनक अर्थव्यवस्थेचा कृषी क्षेत्रावर परिणाम : पाटील

टीम अॅग्रोवन

नाशिक  : आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे, अशी रोज बातमी येते. १९९१ पासून ते २०१० पर्यंत या देशाची प्रगती जवळपास १० टक्के विकासदराने होत गेली. पण गेल्या सात-आठ वर्षांत हा विकासदर साडेतीन ते चार टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. एकही रुपयाची गुंतवणूक झालेली नाही. नवीन रोजगारनिर्मिती नाही. कोणत्याही प्रकारचे मापदंड वापरले तर ही अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे दिसते. या चिंताजनक परिस्थितीचा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो आहे, असे मत राज्याच्या कृषी विभागाचे निवृत्त सचिव नानासाहेब पाटील यांनी केले. नाशिक शहरातील रावसाहेब थोरात सभागृहात जय किसान फार्मर्स फोरमतर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या ''कृषीरत्न'' पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री वसुधा देशमुख, इफकोच्या संचालिका साधना जाधव, कुर्मी महासभेच्या महिला अध्यक्षा लता चंद्राकर, डॉ. मंगेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, सदूभाऊ शेळके, गोरख बोडके, आकाशवाणी, मुंबईचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष जाधव, संयोजक प्रा. डॉ. संजय जाधव आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, १९६१ मध्ये आपल्याकडील जे जमीनधारणा साडेचार हेक्‍टर होते ते आता एक हेक्‍टरच्या खाली आहे. महाराष्ट्रात ८० टक्के लोक आता असे आहेत की ज्यांचे जमीनधारणा ४० ते ५० गुंठे असे आहे. महाराष्ट्रातला ५३ टक्के शेतकरी दारिद्य्र रेषेखाली आहे अशी खंत व्यक्त केली. श्रीमती देशमुख यांनी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड तसेच तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे सांगितले. या सोहळ्यात ॲग्रोवनचे बातमीदार मुकुंद पिंगळे, दामोधर सानप (ढकांबे), रमेश पाटील (मोकभणगी, कळवण), शरद आडके (नाणेगाव), बाळासाहेब देवरे (वाजगाव, देवळा) यांच्यासह ३९ शेतकरी व शेतीसंदर्भात काम करणाऱ्यांना सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक संजय जाधव यांनी केले. सूत्रसंचालन रेखा महाजन यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT