कांदा अनुदानाची घोषणा हवेतच
कांदा अनुदानाची घोषणा हवेतच 
मुख्य बातम्या

नाशिक : कांदा अनुदानाची घोषणा हवेतच

टीम अॅग्रोवन

नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. अनुदान देण्याच्या कामकाजात अनेकदा चालढकल झाली. अखेर ३१ ऑगस्टअखेर अनुदान वर्ग होईल, असे आश्वासन सरकारकडून मिळाले होते. मात्र, हे कामकाज संथगतीने सुरू असून, नेमके किती कांदा उत्पादकांना अनुदान मिळाले, याची आकडेवारी उपलब्ध नसल्याने कांदा अनुदानाची ३१ ऑगस्टअखेर वितरणाची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर ३१ ऑगस्टपूर्वी कांदा अनुदान देण्याची पुन्हा एकदा घोषणा झाली. मात्र, आता हे कामकाज जरी सुरू असले तरी अनेक उत्पादकांना अनुदान मिळाले नसल्याचे समोर येत आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयास संपर्क साधला असता आयसीआयसीआय बँकेमार्फत कामकाज सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, अजूनही अनेक कांदा उत्पादक, जे अनुदानास पात्र आहेत, त्यांपैकी काहींना अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लाभार्थ्यांची माहिती अपलोड केली. हे कांदा अनुदान वितरित करण्याचे कामकाज आयसीआयसीआय बँकेमार्फत सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

कांदा अनुदान देण्याबाबत सरकारचा हेतू स्वच्छ नाही. हे अनुदान मे- जूनमध्ये मिळणे अनिवार्य होते. मात्र, आता निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काम सुरू आहे. अजूनही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुदान न मिळण्याबाबत एक आठवडा उलटूनही पैसे मिळत नाहीत, तरीही सरकार व यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहात नाही. याचा कांदा उत्पादक संघटना निषेध करते.  - भारत दिघोळे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

कांदा अनुदानाच्या बाबतीत सरकारने कांदा उत्पादकांना गाजर दाखवलं. सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही. शेतकऱ्यांना ५०० रुपयांची मागणी असताना २०० रुपये मिळाले तेही वेळेवर दिलेले नाही. - हरिभाऊ महाजन, कांदा उत्पादक व तालुकाप्रमुख, प्रहार शेतकरी संघटना, येवला

जिल्ह्यातील कांदा अनुदानाची स्थिती 
एकूण लाभार्थी १ लाख ९१ हजार ११५ 
कांद्याची आवक ९९ लाख ७८ हजार ५१२ क्विंटल 
आवश्यक निधी १९९ कोटी ५७ लाख २ हजार ५०८ रुपये
माहिती अपलोड केलेल्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख ८९ हजार ७६५ 
शिल्लक लाभार्थ्यांची संख्या ९७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT