अमरावती सर्वांत उष्ण, मुंबईत उष्णतेची लाट
अमरावती सर्वांत उष्ण, मुंबईत उष्णतेची लाट  
मुख्य बातम्या

अमरावती सर्वांत उष्ण, मुंबईत उष्णतेची लाट

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात उन्हाची ताप सातत्याने वाढत असल्याने उन्हाळा जाणवू लागला आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमान ४०.३ अंशांवर पोचल्याने, तसेच त्यात सरासरीच्या तुलनेत ७.५ अंशांची वाढ झाल्याने मुंबईत उष्णतेची लाट आली होती. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार गेल्याने उन्हाच्या चटक्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे.  

कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे असेल आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट आणि ६.४ अंशांपेक्षा अधिक वाढ झाली असेल तर उष्णतेची तीव्र लाट समजली जाते. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी तापमान चाळीशी पार गेले असून, अमरावती येथे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर परभणी आणि अकोला येथे ४१.४ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील खारगोणे येथे देशातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

मंगळवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.२ (३.९), धुळे ४०.२, जळगाव ४०.६ (१.८), कोल्हापूर ३८.७ (२.०), महाबळेश्वर ३४.० (२.७), नाशिक ३९.१ (३.१), सांगली ३९.० (१.३), सातारा ३९.१ (३.५), सोलापूर ४०.७ (२.०), आलिबाग ३३.५ (०.९), डहाणू ३३.५ (२.३), सांताक्रूझ ४०.३ (७.५), रत्नागिरी ३२.५ (२.४), औरंगाबाद ३८.४ (१.९), परभणी ४१.४ (३.१), अकोला ४१.४ (३.१), अमरावती ४१.६ (३.३), बुलडाणा ३७.२ (२.३), बह्मपुरी ३९.७ (२.०), चंद्रपूर ४०.२ (१.१), गडचिरोली ३८.२, गोंदिया ३५.५ (-१.९), नागपूर ३९.१ (१.५), वाशीम ३९.०, वर्धा ३९.९ (१.९), यवतमाळ ४०.० (२.५).  ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झालेली ठिकाणे :  अमरावती ४१.६, परभणी ४१.४, अकोला ४१.४, सोलापूर ४०.७, जळगाव ४०.६, सांताक्रूझ ४०.३, धुळे ४०.२, पुणे ४०.२, चंद्रपूर ४०.२, यवतमाळ ४०.०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT