विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा 
मुख्य बातम्या

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

टीम अॅग्रोवन

पुणे : कोकण वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले अाहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. अकोला येथे तापमानात आणखी वाढ होत रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये हंगामातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. ३) विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.   तापमान ४० अंशांपेक्षा अधिक असेल आणि सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली असेल, तर उष्णतेची लाट समजली जाते. त्यानुसार रविवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, सौराष्ट्र आदी राज्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. पश्चिम मध्य प्रदेशातील खारगोणे येथे सलग दुसऱ्या दिवशी देशातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, परभणी, साताऱ्यात उष्णतेची लाट आली आहे.  राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा खुपच वाढला आहे. परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेला आहे. तर धुळे, जळगाव, नांदेड, बीड, यवतमाळ ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता. १) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका कायम राहणार आहे.   रविवारी (ता. ३१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.८ (४.१), धुळे ४२.०, जळगाव ४२.६ (३.०), कोल्हापूर ३७.७ (१.१), महाबळेश्वर ३४.१ (२.६), नाशिक ३९.७ (३.१), सांगली ३८.४ (०.८), सातारा ४०.४ (४.६), सोलापूर ४१.७ (२.९), आलिबाग ३१.२ (-०.१), डहाणू ३२.८ (०.८), सांताक्रूझ ३१.४ (-१.९), रत्नागिरी ३२.६ (०.८), औरंगाबाद ४०.६ (३.५), परभणी ४३.२ (४.५), नांदेड ४२.० (३.१), बीड ४२.१ (४.२), अकोला ४३.६ (४.९), अमरावती ४३.२ (४.६), बुलडाणा ३८.५ (३.०), बह्मपुरी ४०.९ (२.५), चंद्रपूर ४३.१ (३.७), गडचिरोली ४१.० (१.२), गोंदिया ४०.४ (२.६), नागपूर ४३.३ (५.२), वाशीम ४१.०, वर्धा ४३.४ (४.६), यवतमाळ ४२.२ (४.२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT