अवकाळी, गारपिटीमुळे  फळपिकांचे १८ लाखांचे नुकसान  In Akola, the funds for excess rainfall went to the tehsildar's account
अवकाळी, गारपिटीमुळे  फळपिकांचे १८ लाखांचे नुकसान  In Akola, the funds for excess rainfall went to the tehsildar's account 
मुख्य बातम्या

अवकाळी, गारपिटीमुळे  फळपिकांचे १८ लाखांचे नुकसान 

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्गनगरी : जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १८७ शेतकऱ्यांचे १०१ हेक्टरवरील फळपिकांचे सुमारे १८ लाख ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासनाकडे पाठविला आहे. 

जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यातील गावातील फळपिकांना गारपिटीचा मोठा तडाखा बसला. काजू, आंबा पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. काजुला मोहोर आणि फळधारणा झालेली असताना गारपीट झाल्यामुळे काजू पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले होते. या नुकसानीचा पंचनामा कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आला होता. 

अवकाळीचा सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला होता. या तालुक्यातील १०३ शेतकऱ्यांचे ५६ हेक्टरवरील फळपिकांचे सुमारे १० लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्या पाठोपाठ कणकवली तालुक्यातील ७६ शेतकऱ्यांचे ४४ हेक्टरवरील पिकांचे ८ लाखाचे नुकसान झाले. सावंतवाडीतील ८ शेतकऱ्यांचे २१ हजार रुपयांचे नुकसान झाले. या शिवाय उन्हाळी शेतीचे देखील नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले. त्यानुसार जिल्ह्यातील १०१ हेक्टर क्षेत्रावरील फळपिक आणि शेतीचे सुमारे १८ लाखांचे ३९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. 

प्रतिक्रिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. या नुकसानीचा अहवाल तयार करून त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर तो अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नुकसानभरपाई अद्याप प्राप्त झालेली नाही.  - अरुण नातू, क्षेत्रविकास अधिकारी, कृषी विभाग सिंधुदुर्ग 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT