अजित पवार  
मुख्य बातम्या

मुळशी धरणाचे पाणी घेऊन टाटांना वीज विनामूल्य द्यावी

मिलिंद संगई

बारामती : मुळा नदीवरील मुळशी धरणातील पाच टीएमसी पाणी पुणे शहर व जिल्ह्याला घेऊन त्या बदल्यात या पाण्यापासून तयार होणारी वीज सरकारने टाटा कंपनीला विनामूल्य दिली तर या पाण्याबाबत निर्माण झालेला प्रश्न सुटू शकतो, असा नवा व्यवहार्य फाॅर्म्यूला माजी जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी सुचविला.            या संदर्भात बोलताना श्री. पवार म्हणाले की, मुळशी धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने टाटा कंपनीच्या वीजनिर्मितीसाठी केला जातो. सद्यःस्थितीचा विचार केल्यास अपारंपरिक ऊर्जास्रोतापासून वीजनिर्मितीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीचे पाणी कमी पडत असल्याने मुळशी धरणाच्या पाण्याचा वापर प्रामुख्याने पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासह जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी व्हायला हवा. या पाण्यापासून टाटा कंपनी जेवढी वीज तयार करते तेवढी वीज राज्य सरकारने टाटा कंपनीला विनामूल्य देऊ केली तर त्यात टाटा कंपनीचेही काही नुकसान होणार नाही व त्यांच्याकडून फुकट पाणी घेतले असेही घडणार नाही. राज्य सरकारने या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुळशी धरणाच्या पाण्यापासून तयार झालेली वीज मुंबई शहरासाठी वापरली जाते. आता सौरऊर्जा, पवनऊर्जा, कोळशापासून अणुऊर्जा तसेच सहवीजनिर्मितीपासून वीज तयार होते आहे, त्यामुळे वीजनिर्मितीवर पाणी वाया घालवण्याऐवजी ते पाणी पुणे शहर व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी द्यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  धरणे खर्चिक पाण्यासाठी नवीन धरण उभारणे अत्यंत खर्चिक काम असल्याने उपलब्ध धरणांतील पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले गेले तर त्याचा फायदा पुणे शहराला प्रामुख्याने होऊ शकेल, असेही मत श्री. पवार यांनी व्यक्त केले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT