सरकारचं डोकं फिरलंय का ? : अजित पवार
सरकारचं डोकं फिरलंय का ? : अजित पवार 
मुख्य बातम्या

सरकारचं डोकं फिरलंय का ? : अजित पवार

टीम अॅग्रोवन

नागपूर : सध्या दूध दरावरून राज्य सरकार आणि सहकारी दूध संघ यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. २२) राज्य सरकारचं डोकं फिरलंय का, असा सवाल करत हल्लाबोल केला. विधानसभेत तारांकित प्रश्नावरील चर्चेवेळी ते बोलत होते.  राज्य सरकारने जून महिन्यात गायी आणि म्हैशीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सोलापूर जिल्हा दूध संघाने कागदोपत्री दूध दरवाढ करून निपटारा शुल्कापोटी प्रतिलिटर ३ रुपये कपात करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. या संदर्भात सरकारने काय कारवाई केली आहे, अशी विचारणा आमदार भारत भालके यांनी केली होती.  त्यावर पदूममंत्री महादेव जानकर यांनी याची कबुली देत या प्रकरणात संघाला सहकारी संस्था अधिनियम कलम ६८ अन्वये नोटीस बजावल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यानंतर संघाने दर कमी केल्यामुळे आलेल्या फरकाची ६ लाख ५६ हजार ९१८ रुपये इतकी रक्कम दूध उत्पादकांना दिल्याचे स्पष्ट केले. याशिवाय निपटारा शुल्कापोटी कपात केलेली १० लाख ७४ हजार ४०७ रुपये रक्कमही शेतकऱ्यांना दिल्याचे सांगितले.  दरम्यान, अजित पवार यांनी सरकारचं डोकं फिरलंय का? असा सवाल करीत दूध उद्योगाची अडचण समजून घेत उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. दूध भुकटीचे दर कोसळल्याने संघ संकटात आले आहेत. अशात दुधाचा दर २७ रुपये केल्यामुळे संघ अडचणीत आले आहेत, दूध संघ संपले तर दूध उत्पादक शेतकरीसुद्धा अडचणीत येतील. दूध संघ तयार करत असलेली दुधाची पावडर परदेशात पाठवा म्हणजे दुधाची बाजारपेठ सुधारेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT