उजनीत सापडला दुर्मीळ आहेर मासा 
मुख्य बातम्या

उजनीत सापडला दुर्मीळ आहेर मासा

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर, जि. पुणे ः तालुक्‍यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या बाभूळगाव येथील बाबा मोरे, अमित कावरे, बापू माने यांच्या जाळ्यात दुर्मीळ तसेच औषधी गुणधर्म असणारा साडेसहा किलो वजनाचा 'आहेर' जातीचा मासा सापडला. या माशास इंदापूर मासळी बाजारात प्रतिकिलो दोन हजार रुपयेप्रमाणे तेरा हजार रुपये असा उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली. उजनी जलाशयात वेगवेगळ्या जातींचे ३० प्रकारचे मासे आढळतात. मात्र, जलाशयात मत्स्यबीज सोडण्यात हेळसांड झाल्याने व चिलापी माशाच्या आक्रमणामुळे कटला, मरळ, रहू, शिंगाडा, चांभारी, वाम हे पूर्वी मुबलक प्रमाणात मिळणारे मासे सध्या कमी प्रमाणात मिळत आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वांत मोठा मासेमारीचा व्यवसाय उजनी धरण व पाणलोट क्षेत्रात चालतो. धरणातील मासे परदेशांतही पाठविले जातात. या धरणात चिलापी व चांभारी जातीचे मासे मुबलक प्रमाणात मिळतात. इंदापूर मासळी बाजारात चिलापी जातीच्या माशाला मोठी मागणी आहे. उजनी धरणातील गोड्या पाण्यातील माशांना मुंबई, हैदराबाद, कोलकता येथील बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT