Market Bulletin:सोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु झाले आहेत. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव आज १०० रुपयांनी कमी झाले होते. तर बाजार समित्यांमध्ये दरपातळी काहीशी स्थिरावली होती. सोयाबीनचा भाव ६ हजार ७०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनला वाढलेल्या भावात मागणी काहीशी कमी झाली आहे. याचा परिणाम दरावर दिसत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. सोयाबीनच्या भावात सध्याच्या पातळीवर काहीसे चढ उतार दिसू शकतात, अशी मागणी सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस टिकूनदेशातील बाजारात कापसाच्या भावात स्थिरता आली आहे. वाढलेल्या भावात कापसाचा उठावही स्थिरवला असल्याचे उद्योगांनी सांगितले. सध्या बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. पण पुढे उठाव वाढत नसल्याने दर दोन आठवड्यांपासून स्थिर आहेत. सध्या बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव काहीसे स्थिरावले आहेत. कापसाच्या भावात झालेली वाढ आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले; कापूस भाव स्थिर, हळदीची आवक टिकून, ज्वारी आवक सुधारली तर डाळिंब आवक कमी .मक्याचा भाव दबावातचदेशातील बाजारात मक्याचा भाव दबावात आहे. मक्याचा भाव हमीभावापेक्षा १५ ते २० टक्के कमी आहे. मक्याची बाजारातील आवकही चांगली सुरु आहे. सरकारने नव्या हंगामातील मक्याचा हमीभाव केवळ १० रुपयांनी वाढवला आहे. मक्याला उठाव मात्र स्थिर असल्याने भावपातळी दबावात आहे. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरासरी १७०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याची बाजारातील आवक पुढील काही काळ चांगली राहण्याची शक्यता आहे. याचा दरावर दबाव राहील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: कापूस भाव तेजीतच; सोयाबीन तेजीत, कांदा व हरभरा दबावातच तर ज्वारी आवक सुधारली.बाजरी आवकेचा दबावदेशातील बाजारात बाजरीची आवक चांगली सुरु आहे. आवकेचा दबाव असल्याने बाजरीच्या दरावर दबाव आहे. बाजरीला सध्या उन्हामुळे कमी उठाव आहे. यंदा बाजरीचे उत्पादनही चांगले असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजरीला सध्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. बाजरीला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी २२०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान वाण आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. बाजरीची बाजारातील आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजरीच्या भावावरील दबाव काही दिवस कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .तूर स्थिरावलीदेशातील बाजारात तुरीचा भाव मागील काही दिवसांपासून हमीभावाच्या आसपास पोचला आहे. पण दरपातळी या दरम्यान स्थिरावलेली दिसत आहे. तूर उत्पादक पट्ट्यातील बाजारांमध्ये आजही तुरीची आवक चांगली दिसत आहे. तर तुरीचा भाव यामुळे दबावात दिसत आहे. सध्या तूर बाजारात ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. तुरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याचा अंदाज आहे. तर यंदा एल निनोच्या पार्श्वभुमीवर तुरीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.