VSI
VSI 
मुख्य बातम्या

ऊस उत्पादकतावाढीसाठी उद्या व्हीएसआयमध्ये कार्यशाळा

मनोज कापडे

पुणे : राज्यातील उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी यापुढे संशोधनावर भर देण्याचा संकल्प वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) केला आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या (ता. ९) ‘व्हीएसआय’ने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.  साखर कारखान्यांसाठी स्वंतत्र ऊस विकास कार्यशाळेचे नियोजन करण्याचा निर्णय ‘व्हीएसआय’ने घेतला होता. त्यानुसार उद्या सकाळी दहा वाजता व्हीएसआयच्या मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील मुख्यालयात कार्यशाळेला सुरवात होईल. 

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, कृषी विकास अधिकारी आणि ऊस पुरवठा अधिकाऱ्यांशी यावेळी श्री. पवार संवाद साधणार आहेत. ‘व्हीएसआय’ने शेतकऱ्यांसाठी ‘ऊस शेती ज्ञानयाग’देखील आयोजित केला होता. या उपक्रमातून राज्यातील शेतकऱ्यांना ऊस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासहीत दिले जाते. 

‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार राज्याची ऊस उत्पादकता गेल्या दोन दशकांपासून स्थिर आहे. मात्र, साखर उद्योगात महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या उत्तर भारतात ऊस आणि साखर उत्पादनात चांगली वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. 

उत्पादकता वाढीसाठी कारखान्यांना अर्थातच चांगल्या प्रतीचा ऊस पुरवठा शेतकऱ्यांकडून होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऊस लागवडीकडे भर द्यावा लागणार आहे. सध्याच्या लागवड तंत्रज्ञानात बदल, चांगल्या जातींचा वापर होण्यासाठी ऊस विकास कार्यक्रम राबवावा लागेल, असेही ‘व्हीएसआय’चे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT