संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

...कृत्रिम पावसाचीही तयारी !

टीम अॅग्रोवन

सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त होत असला, तरी राज्य सरकारने कृत्रिम पावसाच्या दृष्टिकोनातून तयारी केली आहे. या कृत्रिम पावसाचे केंद्र सोलापूर येथे सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. येत्या जून महिन्यापासून दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा सज्ज असणार आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सोलापूर येथे कृत्रिम पावसाचे केंद्र सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यास अखेर यश आले. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी सुभाष देशमुख यांच्या मागणीला मान्यता देत येत्या जून महिन्यापासूनच प्रायोगिक पातळीवर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. 

गेल्या वर्षी सोलापूर येथील सिंहगड कॉलेज येथे कृत्रिम पावसासाठी आवश्‍यक रडार बसविण्यात आले होते. त्याद्वारे माहितीचे संकलन व इतर कार्य सुरू होते. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कृत्रिम पावसाचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प जूनपासून कार्यान्वित होतोय. 

सर्वांगीण विचार करता सोलापूर शहराचे भौगोलिक स्थान हे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात असल्याने याचा फायदा होईल. तसेच, अवर्षण प्रवण भागात पाऊस नेहमीच कमी पडतो. त्यामुळे या भागात कृत्रिम पावसाच्या प्रेगामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावता येऊ शकतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT