संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

मूग, उडीद खरेदीची ॲपद्वारे होणार नोंदणी

विजय गायकवाड

मुंबई  : राज्यात यावर्षी मूग व उडीद खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा त्रास वाचावा आणि खरेदी प्रक्रिया सुलभ पद्धतीने पार पडावी यासाठी मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. राज्यात ३ ऑक्टोबरपासून उडीद, मूग खरेदीसाठी ८३ केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

मूग व उडीद खरेदी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पणन राज्यमंत्री श्री. खोत यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पणन विभागाचे सचिव, पणन मंडळाचे अधिकारी, वखार महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत श्री. खोत यांनी, मोबाईल अॅपद्वारे मूग, उडीद खरेदीची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जाईल, शेतकऱ्यांना मूग व उडीद खरेदीसाठी कोणत्या तारखेला बोलवायचे याबाबत संदेशाद्वारे कळविले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा वेळेचा अपव्यय आणि चकरा टाळल्या जाणार आहेत. तरी या पद्धतीत योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.  

स्वच्छ मालाबाबत आवाहन खरेदी केंद्रावर आणण्यात येणारा माल स्वच्छ आणि चाळणी केलेला आणावा. यासाठी शेतकरी व शेतकरी कंपन्यांना आवाहन करावे, असेदेखील श्री. खोत यांनी सांगितले. त्यामुळे मूग व उडीद खरेदी प्रक्रिया लवकर आणि वेळेत पार पाडली जाईल, असे ते म्हणाले.

माल साठवणूक केंद्रांची संख्या वाढवा राज्यात तब्बल ८३ खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात उडीद व मूग घेऊन येतील. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी वखार महामंडळाने राज्यात शेतमाल साठवणूक केंद्रांची (वेअर हाउसची) संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे साठवणूक केंद्र शहरालगतच असावे, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देशही पणन राज्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT