संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या दरामध्ये तफावत

टीम अॅग्रोवन

अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर खरेदी प्रक्रियेत हमालीचे दर वेगवेगळ्या केंद्रांवर कमी-जास्त अाकारले जात असून,  शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असल्याचा अारोप केला जात अाहे. केंद्र बदलताच हमालीचा दरही बदलत अाहे.

राज्यात सध्या हमीभावाने तूर खरेदी प्रक्रिया राबवली जात अाहे. शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी अाधीच अाॅनलाइन नोंदणी केलेली अाहे. अाता यंत्रणांकडून मेसेज अाल्यावर शेतकरी अापला शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर नेत अाहेत. या ठिकाणी माल नेल्यानंतर वाहनातून उतरविणे, त्याची चाळणी करणे येथपर्यंत शेतकऱ्यांनी हमाली द्यावी, असे प्रशासनाने अावाहन केले अाहे. त्यानंतर पुढील मोजमाप व इतर प्रक्रियेसाठी यंत्रणांकडून हमाली दिली जाते. मात्र सध्या शेतकऱ्यांनी अाणलेला शेतमाल वाहनातून उतरविणे, त्याची चाळणी करणे यासाठी शेगाव केंद्रावर ४० रुपये घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे अाहे.

अकोला येथील खरेदी केंद्रावर याच कामांसाठी २७ रुपये अाकारले जातात. काही केंद्रांवर ३० रुपये घेतले जातात. परंतु ४० रुपये दर हा शेतकऱ्यांची पिळवणूक करणारा अाहे. यंत्रणांनी याबाबत योग्य समन्वय ठेवून दर निश्चिती करण्याची मागणी शेतकरी व्यक्त करीत अाहेत.

धान्याची नासाडी अधिक शासन एफएक्यू दर्जाचीच तूर खरेदी करीत अाहे. यासाठी शेतकऱ्यांनी अाणलेल्या मालाची चाळणी हमखास केली जाते. ही चाळणी करताना बारीक अाकाराची तूर, फुटलेले दाणे बाहेर पडतात. या शेतमालाची मजुरांकडून नासाडीसुद्धा अधिक केली जाते. एका पोत्यात चार ते पाच किलोपर्यंत असे धान्य निघते. हे धान्य व्यवस्थित हाताळले जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत अाहे.    

मी बुधवारी शेगाव खरेदी केंद्रावर तूर विकली. या ठिकाणी मला प्रति क्विंटल ४० रुपये हमाली चुकवावी लागली. मी माहिती घेतली असता इतर केंद्रावर कुठे २७ रुपये, कुठे ३० रुपये क्विंटलने हमाली घेतली जात असताना शेगाव केंद्रावर ही अधिक रक्कम घेतली जात अाहे.    - शिवशंकर पोहरे, शेतकरी, उरळ

हमी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा माल उतरण्यासाठी बाजार समितीच्या दरानुसार हमाली घेणे अपेक्षित अाहे. शिवाय ही हमाली चाळणी प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्याला द्यायची अाहे. अाम्ही २० रुपये क्विंटल दर घेण्याबाबत सर्क्युलर काढलेले अाहे. -पी. एस. शिंगणे,  जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT